शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप

By पंकज शेट्ये | Updated: April 24, 2023 20:01 IST

नगरसेवक विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत यांनी भरला अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक रामचंद्र कामत आणि नगरसेवक विनोद कीनळेकर या दोघांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मुरगावचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी (दि.२५) पालिका सभागृहात बैठक होईल. रामचंद्र कामत आणि विनोद कीनळेकर हे दोन्ही नगरसेवक भाजपचे असून ते एकमेकाच्या विरोधात उपनगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्याने सद्या उपनगराध्यक्ष पदाची लढत भाजप विरुद्ध भाजप अशा सारखी झालेली आहे. मंगळवारी मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार हे अजून स्पष्ट झाले नसलेतरी उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी एका नगरसेवकाला भाजप नेते अर्ज मागे घेण्यास सांगणार असल्याची शक्यता आहे. 

काही दिवसापूर्वी अमेय चोपडेकर यांनी मुरगावच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त झाले होते. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार अमेय यांचा एका वर्षाचा उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मुरगावच्या उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यासाठी सोमवारी (दि.२४) दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा वेळ ठेवला होता. मुरगाव नगरपालिकेतील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अमेय चोपडेकर नंतर प्रभाग २३ चे नगरसेवक विनोद कीनळेकर यांना उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्याचे सत्ताधारी गटातील नगरसेवकातील अलिखीत करारात ठरले होते. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक विनोद कीनळेकर बरोबर सत्ताधारी गटातील नगरसेवक रामचंद्र कामत (प्रभाग ७) यांनीही उपनगराध्यक्षासाठी अर्ज भरल्याने येथील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. विनोद कीनळेकर आणि रामचंद्र कामत हे दोघेही भाजप नगरसेवक असून दोघांनीही अर्ज भरल्याने उपनगराध्यक्षाच्या निवडीसाठी सद्या भाजप विरुद्ध भाजप असे चित्र झाल्याचे अनेकात बोलले जात आहे.

उपनगराध्यक्षासाठी दोघेही भाजप नगरसेवक रिंगणात उतरल्याने भाजप विरुद्ध भाजप न व्हावे आणि निवड बिनविरोध व्हावी यासाठी वरिष्ठ नेते एका नगरसेवकाला अर्ज मागे घेण्यास सांगून उपनगराध्यक्षाची निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता जास्त आहे. मंगळवारी उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार ते निकाल घोषित झाल्यानंतरच स्पष्ट होईल, मात्र रामचंद्र कामतची बाजू उपनगराध्यक्ष बनण्यासाठी जास्त भारी असल्याची चर्चा अनेक नगरसेवकात सद्या आहे.

टॅग्स :BJPभाजपा