शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

भाजपा ते भाजप सोपटेंचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 20:25 IST

सुबह का भूला श्याम को वापस अशा प्रकारचा प्रवास काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा सादर केलेल्या दयानंद सोपटे यांचा अद्यापपर्यंत राजकारणात झाला आहे.

-  प्रसाद म्हांबरेम्हापसा: सुबह का भूला श्याम को वापस अशा प्रकारचा प्रवास काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा सादर केलेल्या दयानंद सोपटे यांचा अद्यापपर्यंत राजकारणात झाला आहे. भाजपातून आपली राजकीय कारकिर्द सुरु केलेले सोपटे पुन्हा भाजपात डेरेदाखल झाले आहेत.दयानंद सोपटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला भाजपाचे युवा कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली. त्यानंतर भाजपात त्यांनी विविध पदेही भूषवली. त्यात भाजपा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी अशा विविध पदांचा त्यात समावेश होतो. कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य म्हणून ते उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर सुद्धा निवडून आले होते. तेथे केलेल्या कामांचा प्रभाव पक्षावर पडल्याने त्यांना २००७ सालची पेडणे मतदारसंघातील भाजपची उमेदवारी बहाल करण्यात आली. तत्कालीन काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार तथा तत्कालीन आमदार जितेंद्र देशप्रभू यांचा पराभव करीत ते पेडणेचे भाजपा आमदार झाले. त्यावेळी पहिल्याच लढतीत निवडून येण्यास सोपटे यशस्वी ठरले असले तरी पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्यांना विरोधात बसणे भाग पडले होते.विरोधी पक्षातील आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत आपला प्रभावही पाडला होता. एक प्रभावी आमदार म्हणून आपला प्रभाव टाकलेल्या सोपटे यांनी २०१२च्या निवडणुकीपूर्व घडलेल्या राजकीय घडामोडीत भाजपचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. केलेला प्रवेश त्यांना बराच महागात पडला. माजी मुख्यमंत्री व त्यावेळीचे मांद्रे मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर काही काळ ते राजकारणा पासून दूर राहिले होते ते पुन्हा २०१७ सालच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत.२०१७ च्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच मांद्रेतील उमेदवारी कोणाला मिळणार यावर बरीच चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस पक्षातर्फे दयानंद सोपटे यांच्या सोबत बाबी बागकर, माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, सचिन परब हे या मतदारसंघातील उमेदवारीसाठी इच्छुक होते; पण पक्ष श्रेष्ठींनी शेवटी सोपटे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनी उमेदवारी दिली होती. दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यावेळी पार्सेकरांना कंटाळलेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना निवडून येण्यास सहकार्य केले होते.तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवून दुसऱ्यांदा विधानसभेवर गेलेल्या सोपटे यांच्या पदरात विजय पडला होता. ४० आमदारांच्या विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवण्याचा मान काँग्रेस पक्षाला लाभला होता. विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आले असले तरी इतर पक्षाच्या सहकार्याने भाजपे राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केल्याने पुन्हा विरोधात बसण्याची पाळी सोपटेवर आली होती. निवडणुकीनंतर मागील दीड वर्षाच्या काळात सोपटे हे काँग्रेस सोडणार अशी अफवा सुद्धा सुरू झाली होती. सुरू असलेल्या या अफवेला प्रत्येकवेळी नकार दर्शवला होता. आपण काँग्रेस पक्षात कायम राहणार असल्याचे जाहीर करीत सुद्धा केले होते. शेवटी त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सोपटे यांचे विधान खोटे ठरले असून, त्यांची अफवा मात्र सत्यात उतरली आहे. आपली राजकीय कारकीर्द भाजपातून सुरू करणारे दयानंद सोपटे हे पुन्हा भाजपात दाखल झाले आहेत.