शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुरगाव मतदारसंघात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; मुरगाव भाजप युवा मोर्च्याची नवीन समिती जाहीर

By पंकज शेट्ये | Updated: April 6, 2023 17:30 IST

गुरूवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या सडा येथील कार्यालयात भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वास्को: भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मुरगाव मतदारसंघात गुरूवारी (दि.६) विविध कार्यक्रम आयोजित करून स्थापना दिन उत्साहात साजरा केला. भाजप स्थापना दिना निमित्ताने देश आणि गोव्याच्या इतर भागाबरोबरच मुरगाव मतदारसंघातसुद्धा ‘सोशल जस्टीस वीक’ च्या नावाखाली ६ ते १४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहीती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली.

गुरूवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या सडा येथील कार्यालयात भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात आमोणकर यांच्याबरोबर गोवा भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, डॉ. धमेंद्र प्रभूदेसाई, मुरगावच्या नगरपालिकेच्या नगरसेविका श्रद्धा आमोणकर, मुरगावच्या माजी उपनगराध्यक्ष रीमा सोनुर्लेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भाजप स्थापना दिना निमित्ताने आजपासून पुढचा एक आठवडा मुरगाव मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहीती आमदार आमोणकर यांनी दिली. ‘सोशल जस्टीस वीक’ च्या नावाखाली ते विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून त्यात स्वच्छता मोहीम, मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर, वॉल पेंन्टींग अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. मुरगाव मतदारसंघात भाजप तर्फे ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहीती आमोणकर यांनी दिली. तसेच १४ एप्रिल रोजी मुरगाव मतदारसंघाच्या सर्व ३० बुथांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती आमोणकर यांनी दिली. तसेच अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवा भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष समीर मांर्देकर यांनी भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून मुरगाव मतदारसंघातील भाजप युवा मोर्च्याची समिती जाहीर केल्याची माहीती देऊन शिवप्रसाद महाले यांना अध्यक्ष म्हणून निवडल्याचे सांगितले. गोवा भाजप युवा मोर्च्यांने स्थापना दिनाच्या निमित्ताने पुढच्या एका आठवड्यात गोव्याच्या विविध भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहीती दिली. मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी मुरगाव मतदारसंघात भाजप स्थापना दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केल्याबरोबरच २०२४ सालात होणाºया लोकसभा निवडणूकीच्या तयारीची सुरवात केल्याची माहीती दिली. लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवाराला मुरगाव मतदारसंघातून सर्वांत जास्त मते मिळवून देण्याचे आमचे लक्ष असणार असून त्यात आम्ही यशस्वी ठरणार असा विश्वास संजय सातार्डेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपा