शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

भाजपला ‘न भूतो’ आघाडी

By admin | Updated: May 17, 2014 01:57 IST

मडगाव : ज्या ‘सायलंट व्होटर’वर काँग्रेसचा विश्वास होता, त्या मूक मतदारांचा कौल या पक्षाला मिळालाच नाही.

मडगाव : ज्या ‘सायलंट व्होटर’वर काँग्रेसचा विश्वास होता, त्या मूक मतदारांचा कौल या पक्षाला मिळालाच नाही. दक्षिण गोव्यातून भाजपाने ‘न भूतो’ अशी कामगिरी करताना तब्बल ३२,३३0 मतांच्या आघाडीने विजय मिळविला. १९९९च्या निकालाची पुनरावृत्ती करताना भाजपाचे उमेदवार नरेंद्र सावईकर हे प्रचंड आघाडीने विजयी झाले. त्यांनी घेतलेली मतांची आघाडी एवढी प्रचंड होती की भाजपानेही आपल्याला एवढी आघाडी मिळेल, अशी अपेक्षा केली नसेल. नरेंद्र सावईकर यांना १,९८,७७६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना १,६६,४४६ मते प्राप्त झाली. हे दोन उमेदवार वगळता अन्य उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त झाल्या. तृणमूलचे चर्चिल आलेमाव यांना केवळ ११,९४१ मते मिळाली व पहिल्यांदाच गोव्याच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यांच्या उमेदवार स्वाती केरकर यांना ११,२४६ मते मिळाली. अपक्ष गोविंद गावडे यांना ७,१५२ तर कम्युनिस्ट पक्षाचे राजू मंगेशकर यांना ४,४३७ मते प्राप्त झाली व त्यानंतर जास्त मते मिळविण्याचा क्रमांक ‘नोटा’चा होता. तब्बल ४,0३३ लोकांनी ‘नोटा’च्या बाजूने मतदान केल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. शालोम सार्दिन यांना २,५८६ मते प्राप्त झाली. इतर पाच अपक्षांची मते आठशे ते पाचशे मतांच्या आत होती. खाणपट्टा, काणकोण, केपे हे भाग भाजपाच्या विरोधात जातील, असा तर्क लढवला जात होता. मात्र, या खाणपट्ट्यानेच भाजपाला सर्वाधिक मते दिली. भाजपाला सर्वाधिक आघाडी खाणबाधीत सावर्डे मतदारसंघातून मिळाली. या मतदारसंघात सावईकरांना १६,२४३ मते मिळाली, तर काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स केवळ ४,४00 मते घेऊ शकले. सावर्डेत भाजपाला ११,८४३ मतांची आघाडी मिळाली. सांगेतही भाजपाने ७,७१४ मतांची प्रचंड आघाडी मिळवली. कुडचडे मतदारसंघात ५,७८८ आणि काणकोण मतदारसंघात ५,९0६ मतांची आघाडी भाजपाला मिळाली. मडकई मतदारसंघात भाजपाच्या सावईकरांना मिळालेली आघाडी ११,१४३ मतांची होती. सावईकरांनी १४,0५६ मते या मतदारसंघातून घेतली. तर काँग्रेसला केवळ २,९१३ मते प्राप्त झाली. त्या पाठोपाठ गोविंद गावडेंनी येथे २६,६६९ मते घेतली. मुरगाव मतदारसंघाने काँग्रेसला मदतीचा हात दिला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कुठ्ठाळीत भाजपाने ६३६ मतांची आघाडी घेतली. मुरगाव मतदारसंघात ३,६४९, दाबोळी मतदारसंघात २,२९५ तर वास्को मतदारसंघात २,६0५ अशी एकंदर या मुरगाव तालुक्यातून १0,१७५ मतांची आघाडी भाजपाने घेतली. भरवशाचा सासष्टी तालुका काँग्रेसबरोबर काही प्रमाणात राहिला. या तालुक्यातील आठ मतदारसंघांतून काँग्रेसला १९,१९0 मतांची आघाडी मिळाली. मडगाव व फातोर्डा हे दोन मतदारसंघ वगळता, इतर सर्व मतदारसंघांत काँग्रेस आघाडीवर होते. वेळ्ळीने काँग्रेसला ८,१0५, नुवेतून ७,५९७, नावेलीने २,१९0, बाणावलीने ५,0५८ तर कुंकळ्ळीने ७५0 मतांची आघाडी दिली. फातोर्डात भाजपाला ४३८ आणि मडगावात १,१२८ मतांची आघाडी मिळाली. (प्रतिनिधी)