शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक विष्णू वाघ यांच्या पुस्तकाविरुद्धचा एफआयआर मागे घेणार, मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचा भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:55 IST

मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेला एफआयआर साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मागे घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्याचा दावा प्रदेश भाजपाने मंगळवारी केला.

पणजी- मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेला एफआयआर साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मागे घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्याचा दावा प्रदेश भाजपाने मंगळवारी केला.गोव्यात वाघ यांच्या सुदिरसुक्त या कवितासंग्रहातील काही कविता वादग्रस्त ठरल्या असून त्यावरून गोव्यात बहुजनविरूद्ध उच्चवर्णीय असा तीव्र वैचारिक वाद पेटला आहे. सरकारने नुकताच या पुस्तकाचा प्रस्तावित सरकारी पुरस्कारही रद्द केला. सोशल मीडियावरून सरकारवर काहीजण टीका करत आहेत तर काहीनी समर्थन चालवले आहे. महाराष्ट्रातील कवी अरूण म्हात्रे, महेश केळुस्कर आदींनी वाघ यांच्या कवितासंग्रहाविरूद्ध पोलिसांत नोंद झालेल्या गुन्ह्याबाबत सोशल मिडियावरून निषेध केला आहे. कवितांमधून उच्चवर्णीयांना दोष देण्यात आला असल्याचा गोव्यातील कोकणी काव्य क्षेत्रातील काहीजणांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता प्रथमच भाजपाने या वादात उडी टाकली आहे. पण भाजपाने वेगळी भूमिका घेत वाघ यांच्या सुदिरसुक्तचे समर्थन केले. भाजपाचे उपाध्यक्ष अनिल होबळे यांनी पक्षाच्या सूचनेनुसार मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. वाघ यांच्या पुस्तकात काहीच आक्षेपार्ह नाही. अकारण त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली गेली आहे असे होबळे म्हणाले. वाघ यांनी सामान्य माणसाची भाषा पुस्तकात वापरली आहे. ती भाषा अश्लील नाही. यापूर्वीही पुंडलिक नाईक, दामोदर मावजो आदी गोमंतकीय लेखकांनी अशी भाषा वापरलेली असून त्यावरून कधीच वाद झाला नव्हता असे होबळे म्हणाले.

आपण मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटून चर्चा केली आहे. वाघ हे अत्यंत आजारी असून ते बोलू सुद्धा शकत नाहीत. अशावेळी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल होणे गैर ठरते असे होबळे म्हणाले. सरकार हा विषय वाढवणार नाही, तज्ज्ञांशी बोलूनपोलिस स्थानकातील एफआयआर बंद केला जाईल अशी ग्वाही पर्रीकर यांनी दिल्याचे  होबळे यांनी सांगितले. समाजाच्या तळागाळातील लोक जी भाषा वापरतात, तिच भाषा वाघ यांनी सुदिरसुक्तमध्ये वापरली आहे असे होबळे म्हणाले.