शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:28 IST

Birch by Romeo Lane Fire Video : हैदराबादहून गोव्यात आलेल्या फातिमा शेख या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री आग लागली तेव्हा क्लबच्या डान्स फ्लोअरवर (पहिला मजला) सुमारे १०० लोक उपस्थित होते.

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील प्रसिद्ध 'Birch by Romeo Lane' या नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अग्नितांडवात किमान २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत क्लबमधील कर्मचाऱ्यांसह तीन ते चार पर्यटकांचाही समावेश आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आग लागण्याचे कारण सिलेंडर स्फोट असल्याचे म्हटले असले तरी, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने केलेल्या दाव्यामुळे आगीच्या कारणाबाबत नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हैदराबादहून गोव्यात आलेल्या फातिमा शेख या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री आग लागली तेव्हा क्लबच्या डान्स फ्लोअरवर (पहिला मजला) सुमारे १०० लोक उपस्थित होते.

"आम्ही डान्स करत असताना अचानक आग भडकली आणि धावपळ सुरू झाली. पोलिसांच्या दाव्याप्रमाणे किचनमध्ये नाही, तर डान्स फ्लोअरवरच आग लागण्यास सुरुवात झाली," असे फातिमा शेख यांनी सांगितले.

किचनमध्ये अडकलेआग लागल्यानंतर बचावासाठी लोक खाली धावले. गोंधळात अनेक पर्यटक आणि कर्मचाऱ्यांनी तळमजल्यावर असलेल्या किचनच्या दिशेने धाव घेतली, मात्र तो भाग व्हेंटिलेशन नसलेला 'डेड एंड' असल्याने तिथेच त्यांची कोंडी झाली, असे त्या म्हणाल्या. 

वेगाने आग पसरली...क्लबचे बांधकाम 'पाम लीव्ह्स' सारख्या तात्पुरत्या आणि अत्यंत ज्वलनशील वस्तू वापरून केले होते, ज्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण क्लब आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मृतांपैकी बहुतेकांचा मृत्यू धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे झाला. तळमजल्यावरील किचनमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि पर्यटकांचा व्हेंटिलेशनअभावी श्वास कोंडला. क्लब नदीच्या बॅकवॉटर परिसरात होता आणि प्रवेशासाठी अतिशय अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळापासून तब्बल ४०० मीटर दूर थांबावे लागले. यामुळे बचावकार्य व आग विझवण्यात मोठा विलंब झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Nightclub Inferno: Dancing Turns Deadly, Fire Origin Questioned.

Web Summary : A fire at a Goa nightclub killed at least 25, including tourists. Initial reports suggest a cylinder blast, but eyewitness accounts point to the dance floor as the fire's origin. Many died due to smoke inhalation after becoming trapped in a kitchen lacking ventilation.
टॅग्स :goaगोवाfireआग