शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' इमारतींबाबतचे विधेयक पुढील अधिवेशनात मांडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 13:23 IST

आमदार साळकर यांच्याकडून ठराव मागे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, नगर नियोजन खाते, महसूल खाते, आपत्ती व्यवस्थापन या सर्वांचा सहभाग असू शकतो. त्यामुळे नेमके कोणाच्या अंतर्गत ऑडीट करणे याबाबत कायद्येतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच विधेयक तयार करु आणि पुढच्या अधिवेशनात ते विधानसभेत मांडू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी खासगी ठराव मांडताना या विषयावर भाष्य केले होते. विरोधी पक्ष सदस्यांनाही साळकर यांना पाठींबा दिला. प्रत्युतर देताना डॉ. सावंत यांनी वरील आश्वासन दिले.

राज्यात ३० वर्षे जुन्या असलेल्या अनेक इमारती आहे. काही इमारती तर पोर्तुगीदकालीन देखील आहेत. निश्चितच या इमारती भविष्यात धोकादायक ठरु शकतात. पण येथे कार्यरत असलेली कार्यालये किंवा कुणी जर राहत आहे त्यांची व्यवस्था करणे अथवा त्यांच्या स्थलांतराचा विषयही असेल. त्यामुळे यावर घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. याचा अभ्यास करुन पुढच्या अधिवेशनात याबाबत विधेयक सादर करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढच्या अधिवेशनात हे विधेयक मांडणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर दाजी साळकर यांनी हा खासगी ठराव मागे घेतला.

कार्यालयांचे स्थलांतर करणार

यापूर्वी आम्ही काही इमारतींचे ऑडीट केले आहे, समाज कल्याण खात्याचे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. पण पूर्वीची इमारत खुप प्राचीन असल्याने ती न मोडता केवळ डागडूजीच करण्याचा निर्णय झालेला आहे. जुन्ता हाऊसमधील कार्यालयांना देखील स्तलांतर करण्याबाबत सरकारने विचार सुरु केला आहे. सरकार आवश्यक गोष्टी करणारच आहे, असेही डॉ. सावंत यांनी अधिक माहिती देतानासांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत