शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर शतकातील मोठा घोटाळा!

By admin | Updated: August 7, 2014 01:20 IST

पणजी : न्या. एम. बी. शहा यांच्या तिसऱ्या अहवालात जे काही उघड करून दाखवले ते पाहून मीही आश्चर्याने थक्क झालो. गोव्यातील अनेक मोठ्या

पणजी : न्या. एम. बी. शहा यांच्या तिसऱ्या अहवालात जे काही उघड करून दाखवले ते पाहून मीही आश्चर्याने थक्क झालो. गोव्यातील अनेक मोठ्या कंपन्यांनी राज्याची प्रचंड लूट केली असून हजारो कोटींचे ‘अंडरइनवॉयसिंग’ केले आहे. गोव्याच्या खाण व्यवसाय क्षेत्रातून लुटारूंना हद्दपार करायला हवे. उलट विद्यमान सरकारने जर त्याच कंपन्यांना पुन्हा खनिज लिजेस दिली तर तो शतकातील सर्वात मोठा घोटाळा ठरेल, असा इशारा गोवा फाउंडेशनचे क्लॉड अल्वारीस यांनी दिला आहे. ‘लोकमत’ने बुधवार, ६ आॅगस्टच्या अंकात शहा आयोगाच्या तिसऱ्या अहवालावर झगझगीत प्रकाश टाकला. शहा आयोगाने गोव्यातील प्रचंड मोठी खनिज चोरी दाखवून दिली आहे. अहवालाची प्रत सर्वप्रथम केवळ ‘लोकमत’ला प्राप्त झाली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी डॉ. अल्वारीस यांनी शहा आयोगाच्या अहवालाची प्रत अन्य सर्व प्रसारमाध्यमांना पाठवून दिली. अहवालाविषयी अल्वारीस म्हणाले की, जवळजवळ प्रत्येक खाण कंपनीने अंडरइनवॉयसिंग केले आहे. सरकारचा हजारो कोटींचा महसूल खाण कंपन्यांनी बुडवला आहे. आपण अजूनही तज्ज्ञांच्या मदतीने या तिसऱ्या अहवालाचा अभ्यास करत आहे. प्रत्येक खाण कंपनीच्या नावासह शहा आयोगाने इनवॉयसिंग दाखवून दिले आहे. चारही बाजूंनी अनेक बड्या खाण कंपन्यांनी गोव्याची लूट केली. तरीही पुन्हा त्याच कंपन्यांना सरकार लिज देण्याचा विचार करत असल्याचे संकेत सत्ताधाऱ्यांच्या विधानांमधून मिळतात. त्या खाण कंपन्यांना एक टनदेखील माती काढायला आता देता कामा नये. पुन्हा त्यांनाच लिज देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ. रात्रंदिवस पुन्हा कायद्याची लढाई आम्ही लढू. अल्वारीस म्हणाले की, केवळ २ हजार ७४७ कोटींची लूट शहा आयोगाने दाखवून दिली आहे, असा सरकारने स्वत:चा समज करून घेऊ नये. २ हजार ७४७ कोटी हा एक आकडा काही विशिष्ट विषयांबाबत आहे; पण त्या शिवाय अन्य अनेक महत्त्वाचे आकडे अहवालात आहेत. सगळे आकडे जमेस धरले तर लूट ही हजारो कोटींची होते. शहा आयोगाने त्यामुळेच खाण घोटाळे सीबीआयकडे द्या म्हटले आहे; पण मुख्यमंत्री त्याविषयी अजून काहीच बोललेले नाहीत. (खास प्रतिनिधी)