शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

By समीर नाईक | Updated: March 11, 2024 16:31 IST

जुन्या गोव्यातील सुशोभिकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले.

पणजी : जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा गोव्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महाविद्यालयात १५३ हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत त्यांना या इमारतीचा लाभ होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

जुने गोव्यातील इला फार्म येथे गोवा कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन दरम्यान प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. सोबत कृषी मंत्री रवी नाईक, आमदार तथा गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, जुने गोव्याच्या सरपंच मेधा पर्वतकर, कृषी खात्याचे सचिव अरुणकुमार मिश्रा उपस्थित होते.

पडीक असलेल्या ६५ लाख चौरस मीटर क्षेत्रात शेती करू शकणाऱ्या ६५ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तीन कोटी रुपयांच्या कृषी सेतूचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. या इमारतीचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होणार असून, राज्याबाहेरील अनेक विद्यार्थीही येतील आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा गोवेकरांना होणार आहे. गोव्यात पूर्वी कृषी महाविद्यालय नव्हते. आमचे गोव्याचे लोक शिक्षणासाठी राज्याबाहेर आणि परदेशात जात असत. आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कृषीमंत्री रवी नाईक कृषी क्षेत्रासाठी चांगले काम करीत आहेत, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले. जुन्या गोव्यातील सुशोभिकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले असून, त्यासाठी १७ कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे, असेही फळदेसाई यांनी पुढे सांगितले.

टॅग्स :goaगोवा