शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील आगोंद किनारा आशियात सर्वोत्कृष्ट, जागतिक यादीत 18 व्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:22 IST

गोवेकरांसाठी खूशखबर! वार्षिक ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्काराच्या आशियाई यादीत गोव्याच्या आगोंद बीचला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तीन किमीचा लांबच लांब रुपेरी वाळूचा पट्टा, काठावर असलेले आकर्षक शॉक्स याचबरोबर हा किनारा कासव संवर्धनाचेही केंद्र असल्याने जागतिक स्तरावरील पर्यटकांमध्ये हा किनारा आकर्षण बनला आहे.

मडगाव : गोवेकरांसाठी खूशखबर! वार्षिक ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्काराच्या आशियाई यादीत गोव्याच्या आगोंद बीचला पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. तीन किमीचा लांबच लांब रुपेरी वाळूचा पट्टा, काठावर असलेले आकर्षक शॉक्स याचबरोबर हा किनारा कासव संवर्धनाचेही केंद्र असल्याने जागतिक स्तरावरील पर्यटकांमध्ये हा किनारा आकर्षण बनला आहे.ट्रेव्हलर्स चॉईसच्या आशियाई यादीत एकूण पाच भारतीय किना-यांना स्थान मिळाले असून या यादीत चौथ्या स्थानावर अंदमान व निकोबार बेटावरील राधानगर बीचचे नाव आहे. गोव्यातील बाणावली, मांद्रे व पाळोळे हे समुद्रकिनारे अनुक्रमे 15, 18 व 20 व्या स्थानावर आहेत. ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्कार ट्रीप अ‍ॅडव्हायजर या पर्यटन साईटवरील बुकिंग्सवर आधारित असतो. दक्षिण गोव्यातील अगदी टोकाचा तालुका असलेल्या काणकोणातील आगोंद बीच हा सौंदर्याने नटलेला किनारा असून, ट्रेव्हलर्स चॉईसच्या जागतिक यादीत पहिल्या पंचवीस किना-यांमध्ये त्याला स्थान मिळाले असून, या यादीत तो 18व्या स्थानावर आहे. भारतातील उत्कृष्ट पंचवीस किना-यांमध्ये आगोंदला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. तुर्क आणि कायकोस येथील ग्रेस बे व प्रोव्हिडेन्शियल्स हे किनारे जागतिक यादीत पहिल्या स्थानावर असून या पाठोपाठ ब्राझीलचे बाय द सांचु व फेर्नादो द नोरोन्हा, क्युबाचा वाराडेरो बीच, अरुबाचा ईगल बीच व केमन बेटावरील सेव्हन माईल बीच यांचा क्रमांक लागतो.जागतिक स्तरावर भारतीय किना-यांची आता पर्यटक गंभीरतेने दखल घेऊ लागले आहेत. आशियात आगोंद किना-याला पहिले स्थान प्राप्त झाल्याने हे स्पष्ट झाले आहे. हा किनारा जागतिक यादीतही समाविष्ट आहे. भारतासाठी ही चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ट्रीप अ‍ॅडव्हायजर इंडियाचे व्यवस्थापक निखिल गंजू यांनी व्यक्त केले यामुळे भारतात येणा-या पर्यटकांची संख्या वाढणार आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा