लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुरगाव पोर्ट अॅथॉरिटीच्या मालकीच्या हेडलैंड-सडा येथील जागेवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिले आहेत. या पुतळ्याच्या काढणीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांना घटनास्थळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
करताना पोर्ट अॅथॉरिटीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी न्यायालयाने बेकायदेशीर बांधकाम सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांना न्यायालयाने स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांना या प्रकरणात प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात न्यायालयाने संकल्प आमोणकर यांना नोटीस बजावली आहे.
आता ४ मे रोजी सुनावणी
मुरगाव पोर्ट अॅथॉरिटीने आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून हा पुतळा उभारला गेल्याचा दावा केला होता, ज्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार असून त्या दिवशी न्यायालय पुढील कारवाई निश्चित करणार आहे. सध्या प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या तयारीचा आढावा घेतला जात असून तणाव निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
Web Summary : Goa court ordered the removal of Shivaji Maharaj's statue from port land, deeming it illegal. MLA Amonkar received notice. Next hearing is May 4th; police security heightened.
Web Summary : गोवा कोर्ट ने पोर्ट भूमि से शिवाजी महाराज की मूर्ति को हटाने का आदेश दिया, इसे अवैध माना। विधायक आमोणकर को नोटिस। अगली सुनवाई 4 मई को; पुलिस सुरक्षा बढ़ाई गई।