शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लमाणी व्यावसायिकांवरुन बाणावलीत ‘भायले-भितरले’ वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 18:02 IST

गोव्यातील किनारपट्टी भागात वारंवार धुमसत असलेल्या ‘गोमंतकीय विरुद्ध बिगर गोमंतकीय’ या वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून मडगावपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या बाणावली समुद्र किनाऱ्यावर सध्या लमाणी जमातीच्या व्यावसायिकांविरोधात स्थानिकांनी सवतासुभा उभा केला आहे.

ठळक मुद्देमडगावपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या बाणावली समुद्र किनाऱ्यावर सध्या लमाणी जमातीच्या व्यावसायिकांविरोधात स्थानिकांनी सवतासुभा उभा केला.लमाणी व्यापाऱ्यांची सर्व दुकाने स्थानिकांनी बंद पाडली आहेत.लमाणी म्हणून आम्हाला व्यवसाय करण्याचा हक्क नाही का असा प्रश्न उद्भवून या व्यापाऱ्यांनीही न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील किनारपट्टी भागात वारंवार धुमसत असलेल्या ‘गोमंतकीय विरुद्ध बिगर गोमंतकीय’ या वादाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून मडगावपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या बाणावली समुद्र किनाऱ्यावर सध्या लमाणी जमातीच्या व्यावसायिकांविरोधात स्थानिकांनी सवतासुभा उभा केला आहे. यामुळे लमाणी व्यापाऱ्यांची सर्व दुकाने स्थानिकांनी बंद पाडली आहेत. दुसऱ्या बाजूने आम्ही लमाणी म्हणून आम्हाला व्यवसाय करण्याचा हक्क नाही का असा प्रश्न उद्भवून या व्यापाऱ्यांनीही न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

वासप्पा मलगीमणी उर्फ वासू या टॅक्सी ड्रायव्हरने स्वत: टॅक्सीचे परमीट काढून आपली गाडी बाणावलीतील एका हॉटेलात कामाला लावण्याच्या घटनेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक टॅक्सी चालकांनी आमच्या व्यवसायात आम्ही बिगर गोमंतकीयांना आत शिरू देणार नाहीत असा दावा करुन जोपर्यत लमाणी टॅक्सी व्यावसायिक या व्यवसायातून बाहेर जात नाहीत तोपर्यत बाणावलीच्या किनारपट्टीवर इतर लमाण्यानाही व्यवसाय करु देणार नाही असे सांगून दोन दिवसांपूर्वी ही सर्व दुकाने बंद केली होती. त्यामुळे या भागात वाद उद्भवला होता.

मंगळवारी (19 डिसेंबर) याच पार्श्वभूमीवर रोजी बाणावलीत झालेल्या खास ग्रामसभेत स्थानिकांनी संपूर्ण लमाणी व्यावसायिकांवर निर्बंध आणावेत आणि किनारपट्टीवरील त्यांची दुकाने बंद पाडावीत असा ठराव घेतला. गोमंतकीयांच्या सर्व व्यवसायावर आता बाहेरच्या लोकांचे अतिक्रमण होत असून गोवेकरांच्या पारंपारिक टॅक्सी व्यवसायावरही आता बिगर गोमंतकीय कब्जा करु पहातात असा आरोप यावेळी करण्यात आला. 

दरम्यान, या वादात गोवा बंजारा समाजाने लक्ष घातले असून केवळ आम्ही लमाणी म्हणून आम्हाला गोव्यात व्यवसाय करता येत नाही का असा सवाल या समाजाचे अध्यक्ष गणोश लमाणी यांनी केला आहे. ज्या टॅक्सी चालकाविरोधात स्थानिकांनी आवाज उठविलेला आहे तो मागची 25 वर्षे बाणावली गावात रहातो. मागची 25 वर्षे तो या भागात टॅक्सी चालवित आहे. आता त्याने स्वत:च्या मालकीची टॅक्सी घेतल्यावरच स्थानिकांना तो बिगर गोमंतकीय वाटू लागला का असा सवाल त्यांनी केला आहे. ज्या टॅक्सी ड्रायव्हरच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उठविला आहे त्याला स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव यांनीच ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ जारी केली आहे असेही लमाणी यांनी सांगितले. गोव्यात व्यवसाय करणारे लमाणी व्यावसायिक कायदेशीररित्या आपला व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना अडविण्याचा अधिकार कुणालाही नाही. स्थानिकांची ही अडवणूक चालूच राहिल्यास त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा लमाणी यांनी दिला आहे.

टॅग्स :goaगोवा