शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बीफ खाणाऱ्यांना चौकात फाशी द्या - साध्वी सरस्वती

By admin | Updated: June 15, 2017 01:45 IST

बीफ खाणे स्टेटस सिंबल मानणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे. त्यांचे शरीर जेव्हा चौकात लटकवले जाईल, तेव्हा असे मांस खाण्याचे धाडस कोणी करणार

- सुरेश गुदले । लोकमत न्यूज नेटवर्करामनाथी (फोंडा, गोवा) : बीफ खाणे स्टेटस सिंबल मानणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे. त्यांचे शरीर जेव्हा चौकात लटकवले जाईल, तेव्हा असे मांस खाण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा इशारा सनातन धर्म सेवा प्रचार समितीच्या छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील साध्वी सरस्वती यांनी बुधवारी येथे दिला. केंद्र सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.हिंदू जनजागृती समितीच्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील विविध संघटनांचे १५०पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. साध्वी सरस्वती म्हणाल्या, भारत हिंदू राष्ट्र करूच. ते पाकिस्तानात गेले तर ठीक, नाहीतर पाकिस्तानही हिंदू राष्ट्र करू. शांततेने चर्चेची वेळ निघून गेलेली आहे, आता हत्यारे उचलावीच लागतील. मुलायम सिंह हा शब्द उच्चारणेदेखील पाप आहे.हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की, देशाची फाळणी धर्मावर आधारित झाली. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत घुसडला. आता हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. जेएनयू ही देशद्रोह्यांची टोळी आहे. लोकशाहीत बहुमताने निर्णय घ्यायचे असतात; मग ८० टक्के हिंदू असताना त्यांच्या हिताचे निर्णय कसे होत नाहीत? हिंदूंना सक्तीचे कुटुंब नियोजन, इतरांना मात्र मोकळीक असे का, असा सवाल त्यांनी केला.