शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाणावलीत सहा युवकांना मारहाण: संशयित विमानात बसला असता पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By सूरज.नाईकपवार | Updated: October 8, 2023 17:43 IST

याप्रकरणातील एक हल्लेखोर रविवारी दुपारी विमानाने लंडनमध्ये जाण्यासाठी मोपा विमानतळवर विमानात बसला होता.

लोकमत न्युज नेटवर्क

मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा येथील बाणावली येथे सहा युवकांंना बेदम मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणातील एक हल्लेखोर रविवारी दुपारी विमानाने लंडनमध्ये जाण्यासाठी मोपा विमानतळवर विमानात बसला असताना, कोलवा पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

सॅम्युयल लियो मास्कारेन्स (२१, रा गिरदोली) असे त्याचे नाव आहे. त्याचे अन्य तीन सहकारी सदया फरार असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या हल्ल्यात ॲलोयसिस बार्रेटो हा करमणे येथील युवक गंभीर जखमी असून, त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. त्याचे अन्य मित्र आद्रेल डिकॉस्ता, नोविन कालड्रिया , मेबन फुर्तादो, गॅरी रॉड्रिगिस व गॉर्डन रॉड्रिगिस यांनाही मारहाण झाली आहे. सॅम्युयल याचे अन्य साथिदाराची नावे आकाश आटवेकर, सिध्देश व केशव अशी असून, सदया त्यांचा तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भादंसंच्या ३२३,३२४,५०६ कलमाखाली पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.

मध्यरात्री दीडच्या सुमारास संशयित व जखमी युवकामंध्ये बाणावली येथे एका रेस्टॉरन्मध्ये पर्किगच्या जागेत वाद झाला. त्यावेळी शाब्दीक चकमक उडून बुक्यांनी मारहाण ही करण्यात आली. नंतर संशयितांनी त्या युवकांना खारेबांद येथे गाठले व पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी सळीचाही वापर करण्यात आला. यात ॲलयसिस हा गंभीर जखमी झाला आहे.

सॅम्युयल हा दहा दिवसांच्या सुटीवर लंडनमधून गोव्यात आला होता. रविवारी पुन्हा तो जाणार असल्याने त्याने आपल्या मित्रासमवेत पार्टी केली होती. मध्यरात्री मारहाणीची घटना घडल्यानंतर पोलिस आपल्या मागावर आहेत याची त्याला किचिंतही कल्पना नव्हती. तो मोपा विमानतळावर लंडनला जाणाऱ्या विमानातही बसला होता. पोलिसांनी विमानतळावर जाउन इमिग्रेशन विभागाकडे त्याच्यासंबधी विचारणा केली असत, तो विमानात बसल्याचे पोलिसांनी कळाले. लागलीच पोलिसांनी विमानात जाउन त्याच्या मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी