शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक भावना दुखवाल तर खबरदार: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 09:40 IST

ताळगाव येथील फादरच्या वादग्रस्त व्हिडिओने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आक्षेपार्ह व प्रक्षोभक विधाने करुन लोकांच्या भावना दुखावणाऱ्या कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही. भावना दुखावणारी व्यक्ती हिंदू असो की ख्रिस्ती संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्या धर्मावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकजण आपापल्या भावनेनुसार प्रार्थना करतो. यापुढे कोणीही वादग्रस्त विधाने करुन इतर धार्मियांच्या भावना दुखावल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.

ताळगाव येथील एका ख्रिस्ती धर्मगुरूने हिंदू देव-देवतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, त्यावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वी फादर बोलमॅक्स पेरेरा यांचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ वादग्रस्त ठरला होता. चर्चमध्ये 'शर्माव' देताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अनुद्गारांद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. बजरंग दलाने त्यांच्या अटकेसाठी वास्को पोलिस स्थानकावर धडक दिली होती. फादर बोलमॅक्स यांनी शेवटी माफी मागितली होती. आता ताळगावच्या धर्मगुरुंकडून अशीच हरकत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यांनी चर्चमध्ये संबोधित करताना हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होत आहे.

काय म्हणाले ताळगावचे फादर?

ताळगावच्या ख्रिस्ती धर्मगुरुचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्यांनी एक ख्रिस्ती युवती हिंदू युवकाच्या प्रेमात पडून मंदिरात जाऊन विवाह केल्याचा उल्लेख केला आहे. तिने हिंदू देवाला कसे स्वीकारले? खोट्या देवाची प्रार्थना कशी काय करता? असा प्रश्न करुन हे पाप आहे. अशाने शांती कशी मिळेल? डिप्रेशनमध्ये जाल. देवाशी खेळ करु नका, असे चर्चमध्ये 'शेर्मावि' देताना म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अशा लोकांना अटक करा

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल म्हणाले की, धार्मिक भावना दुखावणा- यांवर कडक कारवाईची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. इतर धर्मीयांच्या देव देवतांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांना अटक व्हायला हवी, मग तो धार्मिक नेता किंवा कोणीही असला तरी कारवाई व्हायला हवी.गोव्यात सर्वधर्मसमभाव आहे. प्रत्येकजण एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. दुसऱ्याच्या धर्माबद्दल प्रक्षोभक विधाने करणे चुकीचे आहे, असे प्रकार घडल्यास सरकार कारवाई करणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत