शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम हॅकर्सपासून बचावासाठी अशी घ्या खबरदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 19:59 IST

एटीएम मशिनला स्कीमर बसवून कार्डवरची माहिती चोरून बँक ग्राहकांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार रोमानिया, बल्गेरिया आणि हंगेरी या तीन देशातील नागरिकांकडून गोव्यात झालेले असून आतापर्यंत अशा प्रकारच्या 12 गुन्ह्यांचा छडा गोवा पोलिसांनी लावला आहे.

मडगाव: एटीएम मशिनला स्कीमर बसवून कार्डवरची माहिती चोरून बँक ग्राहकांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार रोमानिया, बल्गेरिया आणि हंगेरी या तीन देशातील नागरिकांकडून गोव्यात झालेले असून आतापर्यंत अशा प्रकारच्या 12 गुन्ह्यांचा छडा गोवा पोलिसांनी लावला आहे. अशा प्रकारे माहिती चोरल्यानंतर क्लोन कार्डचा वापर करून ग्राहकांचे पैसे काढण्याची मोडस ऑपरेंडी या विदेशी आरोपींकडून वापरली जात असल्याचे लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी एटीएम वापरणा-यांना कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती समाज माध्यमांवर जारी केली आहे.स्किमरचा वापर करून एटीएम कार्ड धारकांना गंडा घालण्याचे बहुतेक प्रकार पर्यटकांची गर्दी असलेल्या भागात होत असल्याने कळंगूटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी यासंदर्भात ग्राहकांनी कुठली खबरदारी घ्यावी याची माहिती देणारा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे गंडा घालणा-या संशयितांना पकडण्यास मदत केल्यास 5 हजार रुपयांचे आणि एटीएमला लावलेला स्कीमर शोधून काढणा-यांना एक हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांनाही असे बक्षीस दिले जाणार, असे कळविण्यात आले आहे.एटीएम कार्डाचा नंबर जेथे टाईप केला जातो त्या की पॅडच्या वर हे स्कीमर बसवून माहिती चोरली जात असल्याचे लक्षात आल्यामुळे एटीएमचा वापर करताना ग्राहकांनी की पॅडच्या वर आपला हात ठेवावा जेणेकरून टाईप केलेली माहिती या मशिनला लावलेल्या की होल कॅमे-यात चित्रीत होणार नाही. असे करण्याबरोबरच एटीएमला कुणी स्कीमर तर बसविला नाही ना याचीही पहाणी करावी, असे पोलिसांनी कळविले आहे.याशिवाय एटीएम मशिन बसविणा-या बँकांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. एटीएम मशिन ज्या ठिकाणी इन्स्टॉल केले आहे तेथे आत व बाहेर पुरेसा उजेड आहे, याची तजवीज करावी. आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. या कॅमे-यात आवाज मुद्रित होण्याचीही क्षमता असावी. एटीएम मशिनच्या बाहेर प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. एटीएम मशिनची ठरावीक कालावधीत तपासणी करावी तसेच या मशिनच्या ठिकाणी अलार्म सिस्टम बसवावी, अशीही सूचना केली आहे. असे एटीएम मशिन निर्जनस्थळी बसविण्यात येऊ नयेत, अशीही सूचना बँकांना केली आहे.

टॅग्स :atmएटीएम