शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्किमिंगद्वारे एटीएममधून चोरलेली रक्कम ग्राहकाला परत देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 18:06 IST

विदेशी चोरट्यांच्या एटीएम स्किमिंग प्रकरणाला बळी पडलेल्या वास्कोतील एका ग्राहकाला सदर बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.

ठळक मुद्देस्किमिंगद्वारे एटीएममधून चोरलेली रक्कम ग्राहकाला परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.

मडगाव - विदेशी चोरट्यांच्या एटीएम स्किमिंग प्रकरणाला बळी पडलेल्या वास्कोतील एका ग्राहकाला सदर बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. तसेच  सदर ग्राहकाला झालेल्या मनस्तापाबद्दल नुकसान भरपाई देण्याचाही आदेश दिला आहे.

पी. व्ही. सावईकर यांच्या अध्यक्षतेखालील मंचाने हा निर्णय दिला. वास्कोतील साऊथ इंडियन बँकेने सदर ग्राहकाला खात्यातून काढली गेलेली 70 हजारांची रक्कम काढलेल्या दिवसांपासून चार टक्के व्याजाने परतफेड करावी आणि त्याशिवाय दहा हजारांची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला. 17 फेब्रुवारी 2018 रोजी दोघां विदेशी नागरिकांनी ही रक्कम  पळवली होती.

वास्कोतील एका खलाशाचे साऊथ इंडियन बँकमध्ये खाते होते. त्याने आपल्या पत्नीला एटीएम कार्ड देऊन त्या कार्डची पीनही दिली होती. 6 फेब्रुवारीला तिने दाबोळी येथील या एटीएममधून दहा हजाराची रक्कम काढली होती. मात्र 17 फेब्रुवारी रोजी तिला या खात्यातून 70 हजार रुपये काढल्याची मॅसेज आला. पर्वरी येथील कॅनरा बँकच्या एटीएममधून ही रक्कम काढली गेली होती.

यासंदर्भात त्या महिलेने बँकेकडे तसेच वास्को पोलिसांकडे तक्रार दिली. बँकेने आपले 70 हजार रुपये परत करावेत असे त्या ग्राहकाने मे महिन्यात मागणी केल्यानंतर बँकेने ती नाकारताना तुमच्या स्वत:च्या चुकीमुळे रक्कम काढली गेली अशी भूमिका घेतल्याने त्या ग्राहकाने मंचासमोर आपला दावा दाखल केला. बँकेने मंचासमोर आपली बाजू मांडताना ग्राहकाने एटीएम कार्ड सुरक्षितपणे न हाताळल्यानेच त्रयस्थ व्यक्तीला त्या खात्यातून पैसे काढता आले अशी भूमिका घेतली.

मंचाने बँकेचा दावा फेटाळून लावताना सदर खात्यातून बनावटगिरी करुन पैसे काढल्याचे बँकेने नाकारलेले नसून नंतर विदेशी आरोपींनी एटीएमला स्किमर लावून हे पैसे पळविल्याचे स्पष्ट झाले आहे असे नमूद करुन या गोष्टीला ग्राहक स्वत: जबाबदार नाही. कुठल्याही ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृतरित्या जर पैसे काढले गेले तर ती बँकेची जबाबदारी असून बँकेकडून सेवेत राहिलेली कमतरता या व्याख्येत ती मोडणारी आहे असे सांगून ही रक्कम फेडण्याची जबाबदारी बँक नाकारु शकत नाही असे नमूद केले. आपले कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी या ग्राहकाची जी धावपळ झाली आणि मनस्ताप झाला त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देणे योग्य ठरेल असे या मंचाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाatmएटीएम