शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाईंच्या बांधकामावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:01 IST

माजी नगर नियोजन मंत्री आणि फातोर्ड्यांचे आमदार विजय सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या बांधकाम बंद करण्याचा आदेश मडगावचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी मंगळवारी जारी केला

मडगाव: माजी नगर नियोजन मंत्री आणि फातोर्ड्यांचे आमदार विजय सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या बांधकाम बंद करण्याचा आदेश मडगावचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी मंगळवारी जारी केला असून, यासंबंधी 20 डिसेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. सरदेसाई यांनी  शेत जमिनीत बेकायदेशीररीत्या हे बांधकाम सुरू केल्याची तक्रार युनायटेड गोअन्स फाऊंडेशनचे डॉ. आशिष कामत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती. सरदेसाई सरकारात नगरनियोजन मंत्री असताना त्यांनी या बांधकामाला सुरुवात केली होती. मात्र नंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर या बांधकाम प्रकरणाने उचल खाल्ली आहे.दरम्यान, याच बांधकामासंदर्भात यापूर्वी एसजीपीडीएनेही कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधी सरदेसाई यांना आज बुधवारी नोटीस पाठविण्यात येणार, अशी माहिती एसजीपीडीएचे सदस्य सचिव अशोककुमार यांनी दिली. सदर जमीन सरदेसाई यांच्या पत्नी उषा सरदेसाई यांच्या नावे असून उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी उषा सरदेसाईंच्या विरोधात मंगळवारी कारणे दाखवा नोटीस जारी केली. हे बांधकाम ताबडतोब बंद करावे आणि 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणा-या सुनावणीस आपल्या कार्यालयात हजर राहावे, असे या नोटिसीत म्हटले आहे.युनायटेड गोअन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कामत यांनी यासंबंधी तक्रार देताना ज्या जमिनीत ही एकमजली इमारत उभी होते, ती जमीन कृषी विभागात येणारी असून मार्च 2019 मध्ये एसजीपीडीएने बेकायदेशीररीत्या त्याचे रुपांतर संस्थात्मक विभागात केले. या बांधकामासाठी एसजीपीडीएकडे सरदेसाई यांनी परवानगी मागताना जमीन रुपांतरणाची सनद जोडली नसल्याच्या बाबीकडे दुर्लक्ष करून एसजीपीडीएने या बांधकामास परवानगी दिली. यासंबंधी एसजीपीडीएकडे तक्रार करून ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे कामत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.