शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

बाबूंचे केपे काँग्रेसच्या ‘हाता’तून निसटे

By admin | Updated: May 17, 2014 01:58 IST

केपे : केपे-काणकोण आपल्यासोबत राहील, अशी काँग्रेसला अपेक्षा होती. मात्र, काणकोणच्या मतदारांबरोबरच केपेच्या मतदारांनीही काँग्रेसचा अपेक्षाभंग केला.

केपे : केपे-काणकोण आपल्यासोबत राहील, अशी काँग्रेसला अपेक्षा होती. मात्र, काणकोणच्या मतदारांबरोबरच केपेच्या मतदारांनीही काँग्रेसचा अपेक्षाभंग केला. ज्या केपे मतदारसंघातून काँग्रेसचे बाबू कवळेकर विधानसभा निवडणुकीत साडेसहा हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले होते, त्याच मतदारसंघात यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपाने १,७२१ मतांची आघाडी घेतली. केपे मतदारसंघ हा केपे नगरपालिका क्षेत्र व उर्वरित पंचायत क्षेत्र अशा दोन भागांमध्ये विभागला आहे. आतापर्यंत परंपरेने हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने राहिला होता. १९९९च्या निवडणुकीत ज्योकिम आलेमाव हे काँग्रेसचे उमेदवार असतानाही हा मतदारसंघ कधीही काँग्रेसच्या हातातून निसटला नव्हता. मात्र, यंदा प्रथमच भाजपने हा मतदारसंघ काबीज केला. भाजपाच्या या यशाबद्दल केपे भाजपा मंडळाचे उपाध्यक्ष व राज्य कार्यकारिणीचे सदस्य राजीव सुखठणकर यांनी केपे मतदारसंघात भाजपाचा आमदार नसतानाही कार्यकर्त्यांनी लोकांची कामे केली, याचेच परिवर्तन भाजपाच्या बाजूने मतांत झाले, असे मत व्यक्त केले. सरकारच्या कित्येक योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा कार्यकर्ते दक्ष राहिले. लोकांना शोधून काढून त्यांच्याकडे योजना पोहोचविल्या. त्यामुळेच प्रथमच केपेत लोकसभा निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतही असाच ट्रेंड दिसेल, असे त्यांनी सांगितले. हा निकाल म्हणजे कवळेकर यांना आलेली उतरती कळा असल्याचा अंदाज भाजपाच्या गोटातून व्यक्त केला जातो. बाबूंची प्रस्थापितविरोधी भूमिका भाजपाच्या फायद्याची ठरली, असा दावा सुखठणकर यांनी केला. मागच्या विधानसभा निवडणुकीतच कवळेकर यांच्याविरोधी वातावरण होते. मात्र, मतविभागणीमुळे ते निवडून आले, असे ते म्हणाले. मात्र, कवळेकर यांना हा दावा मान्य नाही. मोदी लाटेमुळे पंचायत क्षेत्रातील हिंदू मतदार भाजपाबरोबर राहिले, हे कवळेकर यांनी मान्य केले. मात्र, हा कौल आपल्याविरोधात आहे, हा मुद्दा त्यांनी मान्य केला नाही. विधानसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसविरोधी लाट असतानाही आपण साडेसहा हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आलो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केपेत काँग्रेस पक्षाचे मतदार असले, तरीही कित्येकजण बाबू कवळेकर म्हणून आपल्याला मत देतात, अशा मतदारांची संख्या भरपूर आहे. मात्र, या निवडणुकीत मी नसल्यामुळे मतदारांनी भाजपाला मतदान केले, असे ते म्हणाले. केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक यांनीही हा कौल आमदार कवळेकर यांच्याविरोधात नसल्याचा दावा केला. या निवडणुकीत भाजपाला मोदी लाटेचा फायदा मिळाला. तरीही केपेत १७००ची आघाडी मिळाली आहे, ती किरकोळ म्हणावी लागेल. शेवटच्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी केपेत तळ ठोकू न होते. भाजपाने या निवडणुकीत पैशांचा वापरही भरपूर केला. एवढेच नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांना धमक्या देणेही सुरू केले होते. मतदानाला एक दिवस बाकी असताना खोटा आरोप करून भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला अटक केली. या अटकेमुळे कवळेकरही पोलीस स्थानकात अडकून पडले. त्यामुळे मतदारांना बाहेर पडणे कठीण झाले. याचा फायदा भाजपाला झाला, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)