शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात कारवाईसाठी टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 21:24 IST

खाण घोटाळ्यात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबितीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याची मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (ईडी) लिहिले होते.

पणजी: खाण घोटाळ्यात अडकलेला ट्रेडर इम्रान खान याची दुबितीतही बँक खाती असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याची मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने अंमलबजावणी खात्याला (ईडी) लिहिले होते. परंतु अंमलबजावणी विभागाकडून अद्याप त्या संबंधी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खानचे अनेक व्यवहार एसआयटीने उघडकीस आणले आहेत. त्याची दुबईत असलेल्या बँक खात्याची माहितीही उघडकीस आली आहे. हे प्रकार मनी लॉंडरिंगच्या गुन्ह्यात येत आहेत. मनी लाँडरिंग हा एसआयटीच्या अखत्यारीच्या बाहेरील विषय असून अंमलबजावणी विभागच या बाबतीत कारवाई करीत असतो. त्यामुळे तपासाचा हा भाग अंमलबजावणी विभागाकडे सोपविण्यात यावा, यासाठी एसआयटीकडून हे पत्र लिहिण्यात आले होते. अंमलबजावणी खात्याला पत्र पाठवून ३ आठवडे उलटले तरी अद्याप कारवाई झाली होत नसल्यामुळे या प्रकरणात अंमलबजावणी खात्याला रस नसल्याचाही तर्क काढला जात आहे.इम्रान खानकडून करण्यात आलेल्या सर्व गैरव्यवहारांचे पुरावे एसआयटीकडे आहेत. विदेशात खाती असण्याबरोबरच इतर त्याचे इतर अनेक गैरव्यवहार आढळले आहेत. एमएमआरडी कायद्यानुसार एखाद्याला देण्यात आलेले खाण लीज हे लीजधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर होण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. ती न करता त्या खाणीचा पावर आॅफ अॅटर्नी कुणीही देऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही. परंतु इम्रान खानने ते केले आहे. इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाण लिजाची बेकायदेशीरपणे पावर आॅफ अॅटर्नी घेऊन उत्खनन केल्यामुळे हे मंजूर झालेले खाण लीज काढून घेण्याची शिफारस केली आहे.लीजच्या करारात तशी तरतूद असल्याचेही म्हटले आहे. वनखात्याचा व इतर आवश्यक परवाने न घेता आतापर्यंत बेकायदेशीरपणे उत्खनन करून इम्रानने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आहे. वसुलीचे अधिकारी हे एसआयटीला नाहीत, परंतु खाण खात्याला आहेत. त्यामुळे हे पैसे वसूल करून घेण्यात यावेत, अशा आशयाचे पत्र खाण खात्यालाही एसआयटीकडून लिहिण्यात आले आहे. खाण खात्याकडूनही कारवाईची अपेक्षा असून, अद्याप या प्रकरणात खाण खात्याने कोणती कारवाई केली याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

टॅग्स :goaगोवा