पणजी : इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या कमी आहे. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणार्यांची सख्या ८.८ टक्के असून यात पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे, त्यामुळे तंबाखूचे सेवन टाळावे, तंबाखू शरीरास हानिकारक आहे, अशी माहिती तंबाखूविरोधी जनजागृती मोहिमेत सक्रिय असलेले डॉ़ शेखर साळकर यांनी दिली. हे व्यसन सहसा अनुकरणातूनच लागत जाते़ तसेच या व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीस ेव्यसनातून बाहेर पडायचे असल्यास राज्यात दक्षिण गोव्यात हॉस्पिसिओ व उत्तरेत आझिलो या इस्पितळांमध्ये व्यसनमुक्ती केंद्राची सोय करण्यात आली आहे, असेही साळकर यांनी स्पष्ट केले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवा पीढीसमोर अनेक आव्हाने असतात. या आव्हानांना सामोरे जाताना युवा पीढी या व्यसनांच्या आहारी जाते. प्रसारमाध्यमांमधील जाहिराती, चित्रपटांमध्ये दाखविल्या जाणार्या धूम्रपान तसेच इतर व्यसनांची दृश्येही कुठेना कुठे युवा मनावर परिणाम करत असतात. या संदर्भात आपले मत व्यक्त करताना गोवा विद्यापीठाची विद्यार्थिनी प्राची जोशी म्हणाली, सध्याचा युवा वर्ग सुशिक्षित आहे. या व्यासनामुळे होणार्या दुष्परिणामांची महिती असूनही ते या त्यांच्या आहारी जातात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. व्यसन ही एक पळवाट आहे. महाविद्यालयात, शाळांमध्ये शिकविणारे अनेक शिक्षकच आज या व्यसनांच्या आहारी गेलेले आढळतात, ही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे मत जोशी हिने व्यक्त केले. पालक आपल्या पाल्याला सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हातखर्चाला लागतील त्यापेक्षाही जास्त पैसे देतात. पालकांच्या मते पाल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये सासाठी सर्व त्या सुविधा देतात. मात्र, अनेक वेळा पालकंच्या या समजुतीमुळे, आसपासच्या वातावरणामुळे युवा वर्ग आपोआप या व्यसनांकडे वळला जातो. या संदर्भात मत व्यक्त करताना दिलीप देसाई म्हणाले, पालक म्हणजे फक्त पालनपोषण करणारी व्यक्ती नव्हे. पाल्याला यासारख्या व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांचे पाल्याशी मैत्रीचे नाते असणे आवश्यक आहे. कोणत्याही मुलाच्या मनात पालकांविषयी आदरयुक्त भीती असावी. अपल्या समस्या, आपली अडचण मनमोकळेपणाने पाल्य बोलून दाखवेल असे वातावरण असले पाहिजे. तसेच मुलांना त्यांचा छंद जोपासण्यास प्रोत्साहित केल्यास यासारख्या इतर व्यसनांची गरज भासणार नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. (विद्यार्थी प्रतिनिधी)
तंबाखू सेवन टाळा!
By admin | Updated: May 31, 2014 01:35 IST