शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह झाडे करपली

By आप्पा बुवा | Updated: May 14, 2023 18:01 IST

अप्पा बुवा / फोंडा  लोकमत न्यूज नेटवर्क  फोंडा    गावणे -बांदोडा परिसरात खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह माड, पोफळी, ...

अप्पा बुवा / फोंडा लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा   गावणे -बांदोडा परिसरात खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह माड, पोफळी, फणस, मिरी व अन्य झाडे करपून गेली आहेत. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे २०-२५ शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे ६-७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या ६-७ महिन्यापासून खारे पाणी शेतात घुसण्याचा प्रकार घडत असून अजून पर्यंत तरी सरकारतर्फे तोडगा काढण्याचा प्रयत्न झालेला नाही. अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली आहे.बांदोडा व मडकई येथील सीमारेषेवर असलेल्या मानसीचे दरवाजे बंद केल्यास खारे पाणी घुसण्याचा प्रकार त्वरित बंद होवू शकतो. त्यासाठी सरकारने पावसाळ्यापूर्वी मानसीचे दरवाजे बंद करून दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.    गावणे येथील शेतात गेल्या सहा महिन्यापूर्वी मानसीचे दरवाजे खुले केल्याने खारे पाणी घुसून बागायती तसेच शेती नष्ट झाली आहे. परिसरातील सुमारे ३५० पेक्षा अधिक माड व पोफळीची झाडे करपून मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी सध्या सरकारच्या सहकार्याची अपेक्षा बाळगत आहे.एका महिन्यापूर्वी स्थानिक सरपंचांना माहिती दिल्यानंतर पाहणी करून विविध खात्याला निवेदने पाठविण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे. खाऱ्या पाण्याचा फटका वेलिंग परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा बसला असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.     यासंबधी अधिक माहिती देताना शशिकांत गावडे म्हणाले कि  गेल्या ६ -७ महिन्यापासून खारे पाणी पूर्णपणे शेतात घुसून परिसरातील माड, पोफळीची झाडे व अन्य झाडे पूर्णपणे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वी मानसीचे दरवाजे बंद न केल्यास संपूर्ण शेती कायमची सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार येऊ शकते. सरकारने यासंबधी गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.   म्हाद्दू नाईक म्हणतात 'खाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात इथला शेती व्यवसाय इतिहास जमा होईल.पूर्वजांनी लागवड केलेली बागायती गेल्या ६ महिन्यात खाऱ्या पाण्यामुळे नष्ट होण्याचा मार्गावर आहे. बागायती दररोज काळजी घेण्यात येत होती. परंतु खाऱ्या पाण्यामुळे माड व पोफळीची झाडे करपत असल्याचे पाहून दुःख वाटत आहे. सरकारने यासंदर्भात लक्ष देवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असल्याचे जुजे सिल्वेरा यांनी सांगितले.   बांदोडा पंचायतीचे सरपंच सर्वानंद कूर्पासकर यांनी खारे पाणी शेतात घुसल्यांची माहिती मिळाल्यावर स्थानिक पंच व्यंकटेश नाईक सह  स्वतः जाऊन पाहणी केली होती. ते म्हणतात की यासंबधी विविध खात्याना निवेदने देवून आवश्यक तोडगा काढण्याची मागणी पंचायततर्फे करण्यात आली होती. त्यानुसार येत्या आठवड्यात संयुक्तपणे पाहणी करण्यात येणार आहे.