शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे किनारे ठरताहेत जीवघेणे; महिनाभरात ७१ पर्यटकांना  वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 20:34 IST

गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात.

पणजी : गोव्याचे किनारे पर्यटकांना भूरळ घालणारे असले तरी तेवढेच धोकादायकही आहेत याची प्रचिती वेळोवेळी आलेली आहे. समुद्रात उतरण्याचा मोह अनावर होतो आणि पर्यटक नंतर संकटात सापडतात. चालू आॅक्टोबर महिन्यातच दृष्टी लाइफ सेविंगच्या जीवरक्षकांनी ७१ पर्यटकांना वेगवेगळ्या किना-यांवर बुडताना वाचविले यात ९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. 

मोरजी किना-यावर गुरुवारी २५ रोजी तीन रशियन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. ४ आॅक्टोबर रोजी गोव्याचा पर्यटक मोसम सुरु झालेला आहे. चार्टर विमानेही येऊ लागली आहेत. गोव्याला भेट देणाºया विदेशींमध्ये रशियन पर्यटकांची संख्या जास्त आहे. २५ रोजी कळंगुट किनाºयावर अन्य एका घटनेत कर्नाटकच्या तीन पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. बागा, कांदोळी, हरमल तसेच अन्य किना-यांवरही पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. 

दृष्टी लाइफ सेव्हिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले की, ‘खराब हवामान असल्यास पुरेसे सतर्कतेचे इशारे आम्ही देत असतो.  कंपनीचे जीवरक्षक चांगली सेवा देत असतात. मुंबई अग्निशामक दलानेही या कंपनीचा किनारा सुरक्षेसाठी सहयोग घेतलेला आहे. गोव्यातील किनाºयांवर कंपनीचे सुमारे ६00 जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. याशिवाय दुधसागर, मयें तलाव यासारख्या ठिकाणीही जीवरक्षक तैनात केलेले आहेत. २00८ पासून ही कंपनी गोव्यात सेवा देत आहे. गेल्या जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत एकूण २१७ पर्यटकांना बुडताना वाचविण्यात आले. यात ४६ विदेशींचा समावेश आहे. सुरवातीपासून आतापर्यंत ३ हजारहून अधिकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचविले आहेत.’

गोव्यात किना-यांवर बुडून मरण पावणा-यांचे प्रमाण ९९ टक्क्यांनी घटले असल्याचा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :goaगोवा