शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन साळगावकरांच्या छातीत कळा..!

By admin | Updated: June 15, 2017 02:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : बेकायदेशीर खाण प्रकरणात एसआयटीकडून साळगावकर खाण कंपनीचे संचालक अर्जुन साळगावकर यांना त्यांच्या कार्यालयातून

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : बेकायदेशीर खाण प्रकरणात एसआयटीकडून साळगावकर खाण कंपनीचे संचालक अर्जुन साळगावकर यांना त्यांच्या कार्यालयातून एसआयटीच्या कार्यालयात आणून चौकशी केली; परंतु चौकशी सुरू असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे एसआयटीलाच त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. बुधवारी अचानक एसआयटीचे पथक साळगावकर यांच्या आल्तिनो येथील कार्यालयात दाखल झाले. या अनपेक्षित धक्क्यामुळे साळगावकर गोंधळले; परंतु एसआयटी पथकाबरोबर ते निमूटपणे एसआयटीच्या कार्यालयात गेले. एसआयटीकडून त्यांची बराच वेळ चौकशी करण्यात आली. त्यांच्या खाण कंपनीकडून करण्यात आलेल्या उल्लंघनाचे कागदोपत्री पुरावे एसआयटीकडून दाखविण्यात आले. एसआयटीकडून बऱ्याच तयारीनिशी आपल्याला बोलावण्यात आल्याचे साळगावकर यांच्या लक्षात आले. तसेच एसआयटीचे इरादेही स्पष्टपणे कळत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या अटकेचीही तयारी एसआयटीकडून करण्यात आली होती; परंतु साळगावकर यांच्या छातीत दुखणे सुरू झाल्यामुळे एसआयटीला बेत बदलावा लागला. एवढेच नव्हे तर १०८ आणीबाणी सेवेला बोलावून गोवा वैद्यकीय इस्पितळात पाचारण करण्याची वेळ एसआयटीवरच आली. केवळ अटक चुकविण्यासाठी साळगावकर यांच्याकडून छातीतील दुखण्याचे निमित्त सांगण्यात आले असल्याचे लोकांकडून तर्क करणे अपेक्षित असले तरी साळगावकर यांचे दुखणे हे नाटकी नव्हते. त्यांना खरोखरच त्रास सुरू झाला होता, अशी माहिती इस्पितळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. व्हिलचेअरवरून त्यांना रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. काही अटींवर नंतर त्यांना खासगी इस्पितळात उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.खाण प्रकरणाचा तपास अधिकारी बदलल्यानंतर बड्या खाण कंपन्यांना समन्स जाऊ लागले आहेत. पैकी तिघा खाण कंपन्यांच्या संचालकांची एक वेळा चौकशी करण्यात आली आहे. तर नथुरमल कंपनीचे हरिश मेलवानी यांनी समन्सला प्रतिसाद न देता अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दत्तगुरू सावंत या प्रकरणाचे नवीन तपास अधिकारी आहेत.