शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात चर्च खुली करण्यास आर्चबिशपांचा हिरवा कंदील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 21:23 IST

जुने गोवें येथील  ऐतिहासिक बॉ जिझस बासिलिका चर्चसह गोव्यातील अनेक चर्च देश, विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे भाविक दर्शन घेऊ शकलेले नाहीत.

ठळक मुद्देआर्चडायोसिस ऑफ गोवा दमण अ‍ॅण्ड दीव या चर्च संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार चर्चमध्ये उभे राहताना किंवा बाकड्यांवर बसतानाही ६ फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे लागेल.

पणजी : मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करुन राज्यातील चर्च, कपेल भाविकांसाठी खुली करण्यास आर्चबिशपनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता चर्च हळूहळू खुले होतील. मात्र कटेंनमेंट झोनमधील चर्च उघडण्यास मान्यता नाही. जुने गोवें येथील  ऐतिहासिक बॉ जिझस बासिलिका चर्चसह गोव्यातील अनेक चर्च देश, विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे भाविक दर्शन घेऊ शकलेले नाहीत. 

आर्चडायोसिस ऑफ गोवा दमण अ‍ॅण्ड दीव या चर्च संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार चर्चमध्ये उभे राहताना किंवा बाकड्यांवर बसतानाही ६ फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे लागेल. मास्कचा कटाक्षाने वापर करावा लागेल. सॅनिटायझेशन तसेच अन्य गोष्टींचे मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालन करावे लागेल. हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरावा लागेल.

पवित्र जल दिले जाणार नाही तसेच ग्रंथ किंवा पत्रके यांचा वापर केला जाणार नाही. चर्च किंवा कपेलाच्या आवारातही स्वच्छता ठेवावी लागेल. ६५ वर्षे वयापेक्षा अधिक आणि १0 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच कोविडची लक्षणे दाखवणा-यांना चर्चमध्ये येणे टाळावे कारण या वयाच्या व्यक्ती ‘कोविड’ साठी संवेदनशील आहेत. 

या उपाययोजना केल्या आहेत का याची खातरजमा करण्यासाठी चर्चच्या धर्मगुरुंनी ४ ते ८ जणांचे पथक स्थापन करावे. चर्च संस्थेने नेमलेले खास पथक सर्व उपाययोजनांची पाहणी करील, असे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे घालून गेल्या ८ जूनपासून धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली होती. परंतु गोव्यातील चर्च खुल्या झाल्या नव्हत्या.  

टॅग्स :goaगोवा