शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाणावलीत अ‍ॅक्वा पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 02:49 IST

पणजी : साधनसुविधा विकास महामंडळाची बैठक मंगळवारी होऊन तीन वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याचे ठरले. लोलये, पैंगीण येथे

पणजी : साधनसुविधा विकास महामंडळाची बैठक मंगळवारी होऊन तीन वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याचे ठरले. लोलये, पैंगीण येथे १0 कोटींचा छोटा पूल, बाणावली येथे अ‍ॅक्वा पार्क व राजधानी शहरातील दयानंद बांदोडकर मार्गाचे लँडस्केपिंग असे हे तीन प्रकल्प आहेत. ३00 सरकारी प्राथमिक शाळा व हायस्कूल इमारतींची दुरुस्ती महामंडळाने केली असून प्रसाधनगृहेही बांधली आहेत. त्यावर सुमारे ८0 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मडगाव, केपे व पेडणे येथील सरकारी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोलये पुलाचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. बाणावलीचे मत्स्यालय ११ हेक्टर जमिनीत येणार असून सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर (पीपीपी) ते बांधले जाईल. पणजीत दयानंद बांदोडकर मार्गावर लँडस्केपिंग करण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेक डे ना हरकत दाखला मागितला आहे. शाळांसाठी नव्या इमारतीही जागतिक दर्जाच्या बांधल्या जात आहेत. कुडणे, कामराभाट (ताळगाव), टोक (कुंभारजुवे) शाळांसाठी बांधलेल्या इमारती आदर्श अशाच आहेत, असा दावा सावंत यांनी केला. शिक्षण खात्याकडून गरजेनुसार शाळांच्या डागडुजीचे प्रस्ताव येतात त्यानुसार आम्ही कामे करतो, असे सावंत म्हणाले. शाळांना फळे, बाकडेही दर्जेदार असेच दिलेले आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना सावंत यांनी राज्यात शंभर टक्के शाळांमध्ये प्रसाधनगृहे आहेत, असा दावाही केला. साखळी, खांडोळा महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त साधनसुविधा निर्माण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)