शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 20:33 IST

विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत.

म्हापसा : विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे उपसभापती मायकल लोबो यांनी म्हटले. तसेच, आगामी निवडणुकीत मतदार नेत्यांना आपली जागा दाखवून देताना राज्यात बदल घडवून आणतील, असा दावाही लोबो यांनी केली आहे. 

कळंगुट येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी लोबो बोलत होते. सध्या ज्या गतीने राजकीय हालचाली सुरू आहेत. प्रशासनातील कामकाज सुरू आहे ते पाहता राजकारणात त तसेच लोकात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांना गृहीत धरुन चालले जात आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणाला होवू शकतात, असा दावा लोबो यांनी केला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले आहेत. मतदार शहाणा झाला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदार राज्यात बदल घडवून आणणार असल्याचे ते म्हणाले. 

मतदार लोकप्रतिनिधींना आपली कामे करुन घेण्यासाठी निवडत असतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही बऱ्याच मोठ्या असतात. अशा मतदारांच्या अपेक्षा भंग करुन स्वत:च्या स्वार्थापायी दुसºया पक्षात प्रवेश करणे व लोकांना गृहीत धरुन चालणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी हे विधान केले आहे. भाजपात आलेल्या दोन आमदारां व्यतिरिक्त आणखीन दोन आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसा निर्णय त्या दोन आमदारांनी घेतल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील व लोकांच्या अपेक्षेचा भंग होणार असल्याचे लोबो म्हणाले. राज्यातील सरकार यशस्वीपणे चालवायचे असल्यास सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे; पण सध्याचा विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पाडण्यास असमर्थ ठरला आहे. विरोधकांकडून विषयांची मांडणी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यांनी योग्य भूमिका मांडली असती, सरकारातील उणीवांवर बोट ठेवले असते तर सरकार सुद्धा चांगल्या प्रकारे चालले असते असेही लोबो यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारा संबंधी लोबो यांना विचारले असता त्यांनी त्यावर स्वत: निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले; पण सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी लोकांना चांगले प्रशासन उपलब्ध करुन देण्यासाठी जबाबदार व्यक्तीची गरज गोव्याला असल्याची पुष्ठी त्यांनी पुढे जोडली. सरकारातील जेष्ठ मंत्री सुदीन ढवळीकर ही जबाबदार व्यक्ती असू शकते का असा प्रश्न त्यांना केला असता त्यावर पक्ष पातळीवर काय ते ठरवले जावू शकते असेही लोबो म्हणाले. काही दिवसापूर्वी अमेरिकेत उपचार घेवून गोव्यात आलेले माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी त्यांना वगळल्याबद्दल काढलेल्या नाराजीच्या सुरावर विचारले असता, त्यांना ज्याप्रकारे वगळण्यात आले त्यावर डिसोझा यांनी नाराजी व्यक्त करणे योग्य असल्याचे लोबो म्हणाले. ती त्यांची वैयक्तीक नाराजी असून एकेकाळी पक्षाला राज्यात उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान डिसोझा यांनी दिल्याचेही लोबो यांनी सांगितले.   

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा