शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर, चर्चिलच्या मालमत्तेवर टाच

By admin | Updated: March 31, 2017 02:51 IST

पणजी : गाजलेल्या लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणात कॉँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या १.२० कोटी रुपयांच्या

पणजी : गाजलेल्या लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणात कॉँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या १.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी विभागाने (ईडी) गुरुवारी टाच आणली. याच प्रकरणात आमदार चर्चिल आलेमाव यांच्या ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवरही टाच आणली. दोघांच्याही जितक्या मालमत्तेवर टाच आणली तितक्याच रकमेचा भ्रष्टाचाराचा ठपका गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. दोघेही आमदार आता अडचणीत आले आहेत. दिगंबर कामत यांच्या घोगळ-मडगाव येथील ४ हजार ४७ चौरस मीटर भूखंड, ताळगाव येथील रहिवासी बंगला आणि ४१ लाख ३५ हजार रुपयांच्या ठेवींवर टाच आणली आहे. चर्चिल आलेमाव यांच्या ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेत फात्राडे-वार्का येथील आठ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्यांकन २००९ मधील दराप्रमाणे केले आहे. दोघांची टाच आणलेल्या मालमत्तेची एकूण रक्कम ही १ कोटी ९५ लाख रुपये होते. जैका प्रकल्पात कंत्राट लाटण्यासाठी लुईस बर्जर कंपनीने मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा खुलासा अमेरिकेच्या न्यायालयात केला होता. नंतर तपासात तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांची नावे स्पष्ट झालेली होती. त्यानंतर गोव्यात या प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाकडून आणि नंतर अंमलबजावणी विभागाकडूनही दोघांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर चर्चिलना अटक केली होती, तर दिगंबर कामत यांनी अटकपूर्व जामीन मिळविल्यामुळे ते अटकेपासून बचावले होते. चर्चिल आलेमाव यांना एक महिन्याहून अधिक काळ कोलवाळ येथील तुरुंगात काढावा लागला होता. त्याच्या पूर्वी जैकाचे माजी प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर यांनाही अटक केली होती. त्यांच्याकडून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे कलम १६४ अंतर्गत कोणी कोणी दलाली घेतली याचा खुलासा झाल्यानंतर चर्चिल आणि कामत यांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. राजकीय व्यक्ती आणि अधिकारी यांना दिलेली लाच ही हवालामार्फत दिली होती आणि हवाला एजंट रायचंद सोनीलाही पोलिसांनी अटक केली होती. नऊ कबुली जबाबया प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी या प्रकरणात एकूण ९ जणांचे पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कलम १६४ अंतर्गत कबुली जबाब नोंदविण्याचे धाडस दाखविले होते. सर्वच्या सर्व ९ जणांनी पोलीस तपासाला पूरक अशाच जबान्या दिल्या. सावंत यांच्या या कामगिरीमुळे नंतर त्यांचा पोलीस महासंचालकांनी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानही केला. (पान कश् वर)