शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून अनिता थोरात बिनविरोध विजयाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:13 IST

छाननीनंतर अनिता थोरात यांचा बिनविरोध विजय झाल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजप गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयाचे खाते उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या (दि. ५) दिना पर्यंत साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजप उमेदवार अ‍ॅड. अनिता थोरात यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून येण्याच्या दिशेने पोचल्या आहेत. शुक्रवारी (दि. ६) अर्जांची छाननी होणार असून अतिना थोरात यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित होणार आहे.साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघ महीलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला असून बुधवारी (दि. ४) अनिता थोरात यांनी भाजप वरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अनिता थोरात पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक असून त्यांच्याविरुद्ध साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून अन्य कोण उमेदवारी भरतो याच्यावर सर्वांचे लक्ष टीकून राहीले होते. कॉग्रेस पक्षाने उज्वला नाईक यांचे नाव साकवाळ जिल्हा पंचायत निवडणूकीला जाहीर केले होते. गुरूवारी (दि.५) दुपारी १ वाजे पर्यंत उमेदवारी भरण्याचा शेवटचा वेळ होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत अनिता थोरात वगळता इतर कुठल्याच उमेदवाराचा अर्ज आला नसल्याने त्यांची साकवाळ जिल्हा पंचायत निवडणूकीत बिनविरोध निवड होणार असल्याचे एकंदरीत निश्चित झाले आहे. शुक्रवारी अर्जांची छाननी होणार असून यात अनिता थोरात यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजप उमेदवार अनिता थोरात यांच्याविरुद्ध निवडणूकीच्या रिंगणात कॉग्रेस पक्षाने उज्वला नाईक यांना उतरवणार असल्याचे घोषीत केले होते, मात्र त्यांनी शेवट पर्यंत उमेदवारी अर्ज भरला नसल्याने या मागचे कारण काय अशी चर्चा साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातील मतदारात सुरू झाली आहे. पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक अनिता थोरात यांना भाजप ने उमेदवारी जाहीर केल्याने कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना काही प्रमाणात नाराज झाल्याचे मागील दिवसात दिसून आले होते. तसेच भाजप पक्षातील निलम नाईक यांना साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने त्याही काही प्रमाणात नाराज झाल्याचे दिसून आले असून अनिता थोरात यांच्याविरुद्ध आपण उमेदवारी भरणार असा दावा त्यांनी केला होता. दावा केला असला तरी त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत उमेदवारी अर्ज भरला नसल्याने याबाबतही मतदारात चर्चेला उत आल्याचे दिसून आले आहे. साकवाळ जिल्हा पंचायतीतून अनिता थोरात यांच्या अर्जाबरोबरच अन्य दोन ‘डमी’ अर्ज दाखल करण्यात आले असून अनिता थोरात यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे एकंदरीत निश्चित झाले आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छानती करण्यात येणार असून अनिता यांचा अर्ज मान्य झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित होणार आहे.अनिता थोरात यांचा बिनविरोध विजय होणार असल्याचे एकंदरीत निश्चित झाल्याने निवडणूकी पूर्वीच गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजप ने आपले विजयाचे खाते उघडल्याचे दिसून येते. पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांच्या समर्थक अनिता थोरात यांचा विजय एकंदरीत निश्चित झाल्याने पत्रकारांनी गुदिन्हो यांना संपर्क केला असता साकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातील नागरीकांनी आपल्यावर विश्वास दाखवून अनिता थोरात यांना बिनविरोध निवडल्याचे सांगितले. गोव्यात भाजप ने भरारीने विकास केलेला असून येणाऱ्या काळात होणाºया जिल्हा पंचायत निवडणूकीतही मतदार भाजपलाच बहुमताने विजयाचा कौल देणार असल्याचा विश्वास गुदिन्हो यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला. दरम्यान अनिता थोरात यांनी बिनविरोध विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याने व या जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपला विजयाचे खाते उघडून दिल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याची माहीती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Electionनिवडणूक