शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोनसडो परिसरात नायट्रोजन व सल्फर डायोक्साईडचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 19:49 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरातील वायू प्रदुषणाचे निरीक्षण केले आहे, त्यातून हे सिद्ध झाले आहे.

मडगाव: मोठ्या प्रमाणावर प्लास्टीकचा समावेश असलेल्या कच-याची रास मागील आठ दिवस सोनसड्यावर आगीमुळे धुमसत असल्याने या परिसरातील वायुतील नायट्रोजन डायोक्साईड व सल्फर डायोक्साईड या विषारी वायूचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे या परिसरातील लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरातील वायू प्रदुषणाचे निरीक्षण केले आहे, त्यातून हे सिद्ध झाले आहे. या परिसरातील वायुतील पीएम-10 चे प्रमाण प्रत्येक क्युबिक मीटरमागे शंभर मायक्रोग्रॅम असण्याची गरज असताना या प्रदुषणामुळे हे प्रमाण 444 वर पोहोचले आहे तर पीएम-2.5 चे प्रमाण जे 60 मायक्रोग्रॅम सुरक्षित मानले जाते ते प्रमाण दर क्युबिक मीटरमागे 265 मायक्रोग्रॅम एवढे वाढले आहे.या परिसरातील वायु प्रदूषण मोजण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन ठिकाणी यंत्रणा बसविलेली असून जी सोनसडय़ापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. त्यापैकी एक यंत्र पशु संवर्धन इस्पितळाजवळ, दुसरे कार एक्सप्रेस या आस्थापनाजवळ तर तिसरे प्रभाग 7 मधील एका घरात ठेवलेले आहे. या तिन्ही ठिकाणी प्रदूषण वाढल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, या प्रदुषणामुळे या परिसरातील लोकांमध्ये ब्रोंकायटीस, अस्थमा सारखे विकार जडू शकतात असा इशारा स्थानिक डॉक्टरांनी दिला आहे. 28 मे पासून या भागात आग धुमसत असून त्यामुळे सोनसडय़ाबरोबरच बाकभाट व गांधीनगर या परिसरातील लोकांना धुराचा त्रस सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील कित्येक रहिवाशांनी सध्या दुसरीकडे तात्पुरता आसरा घेतला आहे.

अग्नीशमन दलाचा जवान अस्थव्यस्तमागचे आठ दिवस सोनसडय़ाच्या या आगीकडे दोन हात करताना अग्नीशमन दलाचेही जवानांना धुराचा त्रास सहन करावा लागत असून दोन दिवसांपूर्वी हे आग विझविण्याचे काम करताना एका जवानाला श्र्वासोश्र्वास घेण्यास त्रास सुरु झाल्याने त्याला तातडीने इस्पितळात हलविण्यात आल्याची माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी गील डिसौजा यांनी दिली. सदर जवानाला नंतर इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी सध्या त्याला घरी विश्रंती घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा