शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात अमेरिकन कंपनीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 20:15 IST

मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची तयारी अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन या कंपनीने दाखवली असून गोव्याच्या बाबतीत नुकतीच येथील नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे बोलणीही केली.

पणजी : मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची तयारी अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन या कंपनीने दाखवली असून गोव्याच्या बाबतीत नुकतीच येथील नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे बोलणीही केली. मलेरिया पसरविणाऱ्या डासांची निर्मिती कमी करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. गोव्यासह भारताच्या इतर भागातही मलेरिया उच्चाटनासाठी काम करण्याची तयारी या कंपनीने दाखवली आहे.  नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी ही बोलणी प्राथमिक स्वरुपाची असल्याचे सांगितले. मलेरिया निर्मुलनासाठी तज्ञांची सेवा ही कंपनी देणार आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी या कंपनीकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर केला जाईल. या सेवेच्या बदल्यात सरकार या संस्थेला काय मोबदला देणार, असे विचारले असता या सर्व गोष्टी अजून निश्चित व्हायच्या आहेत, असे डिसोझा यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर सन्नीराप्पा यांनी दिल्लीत अशी माहिती दिली की, या उपक्रमांतर्गत मलेरियाबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणली जाईल तसेच खबरदारीच्या बाबतीतही त्यांना शिक्षित केले जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अंदाजानुसार दक्षिण पूर्व आशियात जेवढी मलेरियाची प्रकरणे होतात त्यातील ७५ टक्के प्रकरणे भारतातील असतात. जगभरात मलेरियाचा फैलाव चिंतेचा विषय बनला आहे. लोकांमध्ये उपाययोजनांबाबत जागृतीबरोबरच मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचे अमेरिकेत मुख्यालय असून जगभरात ८१ राज्यांमध्ये शाखा आहेत. दरम्यान, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांशीही बोलणी केल्याचे वृत्त आहे.