शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'तामनार' न आल्यास तरी पर्यायी व्यवस्था; पश्चिम ग्रीडकडून १२०० वीज मेगावॅट आणू

By किशोर कुबल | Updated: May 21, 2024 14:28 IST

सुदिन ढवळीकर : पुढील पाच वर्षात गोव्याची विजेची गरज ३०० ते ४०० मेगावॅटनी वाढेल

पणजी : कर्नाटकने रोखल्याने तामनार प्रकल्प जरी गोव्यात आला नाही तरी पर्यायी व्यवस्था म्हणून पश्चिम ग्रीड कडून वीज आणण्याची तयारी सरकारने चालवली आहे. १२०० मेगावॅट वीज आणण्यासाठी काम प्रगतीपथावर असून येत्या ऑगस्टपर्यंत ते पूर्ण होईल, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

छत्तीसगढ येथून कर्नाटकमार्गे तामगारच्या वीजवाहिन्या येणार होत्या. या प्रकल्पासाठी दक्षिण गोव्यात स्थानिकांचा विरोध आहेच शिवाय कर्नाटकनेही हा प्रकल्प पर्यावरणाच्या नावाखाली रोखला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य आता अधांतरी आहे. गोवा सरकारने त्यामुळे पर्यायी चाचणी सुरू केली.

 ढवळीकर म्हणाले की १२०० मेगावॅट वीज आणण्यासाठी सरकारने मोठा खर्च करून आवश्यक त्या सुविधा उभ्या केलेल्या आहेत. त्या वाया जाऊ दिल्या जाणार नाहीत. पुढील पाच वर्षात गोव्याची विजेची गरज ३०० ते ४०० मेगा वॅटनी वाढणार आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरून आणखी वीज आणावीच लागेल. या पायाभूत सुविधा पश्चिम ग्रीडमधून वीज आणण्यासाठी  वापरल्या जातील.

कॉल सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दरम्यान कॉल सेंटर मध्ये वीज ग्राहकांचे कॉल स्वीकारले जात नसल्याच्या किंवा दुरुत्तरे देत दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत त्याकडे लक्ष वेधले असता मंत्री म्हणाले की, पुढील दोन- ते तीन दिवसात कॉल सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच खात्याच्या साइटवर तक्रार नोंदवता येईल. त्यामुळे थेट मुख्य अभियंत्यांना संदेश जाईल व ते संबंधित विभागातील कार्यकारी अभियंत्याकडून वीज दुरुस्तीचे काम करून घेतील.

टॅग्स :goaगोवा