शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईच्या आंदोलनास सर्व मंत्र्यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:33 IST

म्हादई पाणीप्रश्नी चाललेल्या आंदोलनाला सर्व मंत्र्यांनी आपआपल्यापरीने प्रत्युत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी चाललेल्या आंदोलनाला सर्व मंत्र्यांनी आपआपल्यापरीने प्रत्युत्तर देण्याची भूमिका स्वीकारली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे म्हादई पाणीप्रश्न योग्य प्रकारे हाताळत आहेत व त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.म्हादई नदीचा उगम कर्नाटकात होतो पण या नदीचा बहुतांश भाग हा गोव्यातून वाहतो. गोवा व कर्नाटकमध्ये गेल्या काही वर्षापासून पाण्यावरील हक्कावरून वाद आहे. केंद्रीय पाणी तंटा लवादाने दिलेला निवाडा दोन्ही राज्यांना मान्य नाही व त्यामुळे निवाड्याला न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. मात्र केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला दिलेल्या एका पत्रमुळे गोव्यात येथील भाजप सरकारविरुद्ध जनआंदोलन सुरू झाले. म्हादई नदीचे पाणी वळवून कर्नाटक सरकार जो प्रकल्प उभा करू पाहत आहे, त्यास गोव्याचा विरोध आहे. पण जावडेकर यांच्या मंत्रालयाने त्या प्रकल्पाला मंजुरीचे पत्र दिले. म्हणजेच म्हादईचे पाणी वळवण्यासाठी मान्यता दिली. यामुळे विरोधी पक्षांनी व काही एनजीओंनी आंदोलन चालवले आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्री सावंत यांना टीकेचे लक्ष्य बनवले आहे.मात्र गोव्याचे जलसंसाधन मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, उपमुख्यमंत्री कवळेकर, वीज मंत्री निलेश काब्राल, विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो आदी एकूण आठ मंत्री एकत्र आले व त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्यावर आपला विश्वास जाहीर केला. मुख्यमंत्री सावंत हे म्हादई पाणीप्रश्नी गोव्याचे हित सांभाळत आहेत, म्हादईप्रश्नी शेवटी गोवाच जिंकेल असे हे मंत्री म्हणाले. काही विरोधी आमदार सत्तेतून बाहेर असल्याने वैफल्यग्रस्त होऊन ते म्हादईप्रश्नी राजकारण करत आहेत, असे आजगावकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा