शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 11:35 IST

मयेतील २१५ भूमिपुत्रांना सनद वितरण.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जमिनींचे सर्व प्रश्न निकालात काढण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र सरकारी मालकीच्या जमिनी विकून त्यावर ज्यांनी घरे बांधली असतील ती निश्चितच पाडली जातील. त्यामुळे जमीन बळकावण्याचा नादात कुणी पडू नये, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मये येथील सातेरी मंदिरात काल, बुधवारी २१५ भूमिपुत्रांना सनदांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार प्रेमेंद्र शेट, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, प्रेमानंद म्हांबरे, शंकर चोडणकर, सरपंच विद्याधर करबोटकर, महेश सावंत, दिलीप शेट, भूविमोचन समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर यांच्यासह मयेचे समय्ध उपस्थित होते. मरो येथील जमिनींचा प्रश्न सुटला आहे. आता शेत जमिनीचा प्रश्नही निकालात काढून मयेवासीयांना न्याय देण्यात येणार आहे. एकाच माणसाला दोन सनद मिळणार नाहीत. तसेच जे शिल्लक दावे आहेत त्यासाठी कुटुंबीयांनी सहकार्य करावे, उर्वरित सनदांचे लवकरच वाटप होईल, तसेच मयेतील सरकारी जमिनीत मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी नियोजन करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, सरकारच्या सहकार्याने मये मतदारसंघात मोठी विकास कामे होत आहेत. प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. अनेक त्रुटी दूर करून अमिनीचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष सहकार्यदेण्याचे आवाहन केले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांचे स्वागत शंकर चोडणकर यांनी केले. नारायण नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत