शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सर्व सरकारी खाती प्लॅस्टिक वापर बंद करणार : मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:54 IST

गोव्यातील सगळ्या सरकारी खात्याकडून यापुढे प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पणजीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

पणजी : गोव्यातील सगळ्या सरकारी खात्याकडून यापुढे प्लॅस्टिकचा वापर बंद केला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पणजीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले की प्लॅस्टिक कप, पिशव्या व अन्य प्लॅस्टिकचा वापर थांबविण्याचे आपण सरकारी खात्यांना सांगितले आहे.  एकदम शंभर टक्के वापर बंद होणार नाही. त्यामुळे सध्या सक्ती करत नाही पण प्लॅस्टिकचा वापर थांबविण्याचे ठरले आहे. येत्या मार्च 2018 पासून गोवा सरकारची खाती सर्व शुल्क, कर व अन्य महसुल हा डिजीटल पध्दतीनेच स्वीकारतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

गोवा हे विशेष मुले आणि विशेष व्यक्तींसाठी मैत्रीपूर्ण राज्य केले जाईल. येत्या महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात आपण विशेष व्यक्तींचे पालक आणि एनजीओ यांची बैठक घेईन. त्यांच्या समस्या आणि गरजा आपण समजून घेईन व त्यानुसार पाऊले उचलली जातील. आॅटिजमसारख्या व्याधी असलेल्या व्यक्ती व त्यांचे पालक याना दिलासा दिला जाईल. गोवा हे देशातील पहिले असे राज्य केले जाईल जे विशेष व्यक्तींसाठी मैत्रीपूर्ण असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

विशेष विद्यालयाना साधनसुविधा पुरविण्यासाठी अनुदान व कर्ज देणारी योजना मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुर केली. गोव्यात  विशेष मुलांसाठी एकूण 22 विद्यालये आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा