शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन नागरिकांना पुन्हा गोव्यातून गंडविले; बोगस कॉलसेंटरवर छापा, १३ जणांना अटक

By वासुदेव.पागी | Updated: September 30, 2023 20:10 IST

सांतिनेज - पणजी येथील सिल्विया टॉवर इमारतीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा सारा कारभार चालत होता.

पणजी: अमेरिकन लोकांना गंडविणाऱ्या आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पणजी पोलिसांनी  पर्दाफााश केला असून या कॉल सेंटरमधून  अँमेझोन, एप्पल आणि मायक्रोसॉफ्टच्या उत्पादनांना टेक्नीकल सपोर्ट देणारे केंद्र असल्याचा बनाव करून ही फसवणूक करण्यात आली. 

सांतिनेज - पणजी येथील सिल्विया टॉवर इमारतीच्या ७ व्या मजल्यावरच्या एका खोलीत हा सारा कारभार चालत होता. अमेरिकेतील लोकांना मोबाईल ॲपच्या आधारे इंटरनेट कॉल करून फसवणूक सुरू होती. कधी मायक्रोसॉफ्ट उत्पादनांसाठी एन्टीव्हायरस देण्याचे सांगून तर कधी अमेझोन सेवा तर कधी ॲप्पल उत्पादनासाठी सेवा देण्याचा बनाव चालला होता. त्यासाठी शुल्काची रक्कम ऑनलाईन भरण्यास ते सांगत होते. ती रक्कम गीफ्ट वाऊचरद्वारे फेडण्यास सांगत होते. लोकांनी त्यांच्यावर भरवसा ठेऊन सांगितलेली रक्कम गीफ्ट वाउचरद्वारे फेडली. असे करून लाखो रुपयांची कमाई या लोकांनी केली. या प्रकरणात अनेक तक्रारी अमेरिकेत नोंद झाल्या होत्या. याची माहिती गोवा पोलिसांना मिळाल्यानंतर या बोगस कॉलसेंटरचा छडा लावण्यात आला.  पणजी पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे कॉलसेंटरवाल्यांचा गोंधळ उडाला. त्या कॉलसेंटरमध्ये असलेल्या १३ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. तपन शहा, जयमीन मिस्त्री,मिलिंद गांधी, विशाल भाई,  संदीप सिंग, प्रियंका शक्या, कुणाल नानकु, लंम्सेपी संघा, एलन मेथ्यु, राजीव राणा, राजु बर्मन, देवे शिवम, कबीर सिंग या १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर या १३ जणांसह  काजोल सुवर्णा, मिहीर नाथ, पिउथ्रुशम प्रजापती १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले आला आहे.

अटक करण्यात आलेले आणि गुन्हा नोंदविण्यात आलेले सर्व संशयित गुजरात, नागालँड, महाराष्ट्र आणि उत्तराखंड येथील आहेत.   रोख रक्कम, तसेच संगणक, मोबाईल, लॅपटॉप, राउटर व इतरसाहित्य मिळून २६.४३ लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिकाgoaगोवाfraudधोकेबाजी