शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूननंतर गोव्यात केवळ 10 खाणी सुरू, खनिजाला आंतरराष्ट्रीय बाजारात दर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:34 IST

पणजी : मान्सूननंतर राज्यात केवळ १0 खाणी सुरू झालेल्या आहेत. खनिज उत्खननही अत्यंत धिम्या गतीने चालू आहे.

पणजी : मान्सूननंतर राज्यात केवळ १0 खाणी सुरू झालेल्या आहेत. खनिज उत्खननही अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. ८९ खाण लिजांपैकी केवळ १0 सुरु होऊ शकल्या. खाण खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी यास दुजोरा दिला. गेल्या १ तारखेपासून खाण मोसम सुरू झाला, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गोव्याच्या कमी ग्रेडच्या खनिजाला दर मिळत नाही.शिवाय खाण व्यावसायिकांसमोर अन्य स्थानिक प्रश्नही आहेत. त्यामुळे हा व्यवसाय गती घेऊ शकलेला नाही. ज्या १0 खाणी सुरू  झाल्या, त्यांनी आजपावेतो 0.८३९ दशलक्ष टन इतके उत्खनन केल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत या व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. नैर्ऋत्य मान्सून सुरू झाल्यानंतर चार महिने खाणी बंदच असतात. त्या साधारणपणे आॅक्टोबरमध्ये सुरू होतात. यंदा त्या थोड्या विलंबाने सुरू झालेल्या आहेत. परंतु पूर्ण वेग मिळालेला नाही. ट्रकमालकांना खनिज वाहतूक दर वाढवून देण्याच्या प्रश्नावर केलेले आंदोलन हेही एक कारण आहे. वेदांता व फोमेंतो कंपन्यांनी उत्खनन सुरू केले आहे.वर्षाकाठी २0 दशलक्ष टन खनिज उत्खनन मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. चालू आर्थिक वर्षात ५.५२ दशलक्ष टन उत्खनन आजपावेतो झालेले आहे. मान्सूनपूर्वी ४.६९ दशलक्ष टन उत्खनन झाले होते. त्यावेळी ४0 खाण लिजेस कार्यरत होत्या. मान्सूननंतर प्रत्येक खाणीने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कन्सेंट टू आॅपरेट परवाने घेणे बंधनकारक आहे. २0१६-१७ या गेल्या आर्थिक वर्षात ४६ खाणींनी २0 दशलक्ष टन उत्खनन केले.१२ खाणींना नोटिसादरम्यान, १९९४ च्या अधिसूचनेप्रमाणे पर्यावरणीय परवाने (ईसी)असलेल्या १२ खाणींना परवाने रद्द का केले जाऊ नयेत, अशी विचारणा करणा-या कारणे दाखवा नोटिसा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या असून सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. मंडळाच्या अधिकाºयांनी यास दुजोरा दिला.

टॅग्स :goaगोवा