शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरच्या घटनेनंतर गोव्याच्या खास दर्जाचा मुद्दा संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 23:01 IST

गोव्याला खास दर्जा देणो शक्य नाही हे यापूर्वी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पणजी : गोव्याला खास दर्जा देण्याचा मुद्दा आता जवळजवळ पूर्णपणोच संपुष्टात आला आहे. काश्मिरचा खास दर्जा केंद्र सरकारने काढून घेतल्यानंतर गोव्याला खास दर्जा मिळणो शक्यच नाही हे अधिक स्पष्ट झाले आहे. सरकारसह विरोधी पक्षातीलही अनेकांना ही  गोष्ट पटली आहे.गोव्याला खास दर्जा देणो शक्य नाही हे यापूर्वी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनीही गोव्याला खास दर्जा मिळणार नाही हे स्पष्ट केले होते. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही खास दर्जाचा मुद्दा निकालात काढला आहे. तथापि, प्रत्येक निवडणुकीवेळी सर्व पक्षांकडून गोव्याला खास दर्जा दिला जाण्याची ग्वाही दिली जाते. केंद्र सरकारने अलिकडील काळात कुठच्याच राज्याला खास दर्जा दिला नाही. प्रसंगी या विषयावरून केंद्रातील भाजपने घटक पक्षांसोबत संघर्षही केला. गोव्याला आर्थिक पॅकेज नको पण जमिनी आणि अस्मिता राखण्यासाठी खास दर्जा द्यायला हवा, अशी भूमिका यापूर्वी राज्यातील काही एनजीओंनी घेतली होती. भाजपनेही या भूमिकेला तत्वत: मान्यता दिली होती व काँग्रेसचीही तिच भूमिका होती. 2क्14 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी गोवा भेटीवर आले असता, त्यांनी या भूमिकेचे कौतुक केले होते. गोमंतकीय आर्थिक पॅकेज मागत नाहीत तर शेत जमिनी, संस्कृती- अस्मिता राखण्यासाठी खास दर्जा  मागतात याचे कौतुक वाटते असे मोदी तेव्हा म्हणाले होते. मात्र काश्मिरचा खास दर्जा मागे घेतला गेल्यानंतर कुठलेच राज्य खास दर्जा मागण्यास आता पुढे येणार नाही याची कल्पना सर्वानाच आली आहे. गोवा सरकार उलट आता गोव्यासाठी आर्थिक पॅकेज मागत आहे. जमिनी व अस्मितेचे रक्षण करण्यासाठी स्थानिक कायद्यांमध्येच तरतुदी करता येतील अशी भूमिका काही मंत्र्यांनी घेतली आहे. गोव्याला खास दर्जा मिळावा म्हणून झालेल्या चळवळीत आमदार अॅलिना साल्ढाणा ह्या देखील होत्या. त्यांनी या विषयावर आता मौन पाळले आहे. गोवा म्हणजे स्वतंत्रच काही तरी आहे असा दावा सातत्याने करत आलेला गोव्यातील एक विशिष्ट वर्गही आता गोव्याला खास दर्जा द्या अशी मागणी करण्याचे धैर्य गमावून बसला आहे.दरम्यान, काश्मिरचा खास दर्जा हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पाठींबा दिला. गोव्यातील आम आदमी पक्षाला याविषयी काय वाटते असा प्रश्न जाहीरपणे आता वकील आणि सामाजिक विषयांचे भाष्यकार राधाराव ग्रासियस यांनी केला आहे. आपने गोव्याला खास दर्जाचे आश्वासन दिले नव्हते काय अशीही विचारणा ग्रासीयस यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवा