शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फी पाठोपाठ मडगावातही रिल्स ऑन हिल्स चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 16:03 IST

गोव्यात सुरू होणा-या इफ्फीची लगबग नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस समाप्त होत असतानाच डिसेंबरच्या सुरुवातीला मडगावातही रिल्स ऑन हिल्स या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले

मडगाव: गोव्यात सुरू होणा-या इफ्फीची लगबग नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस समाप्त होत असतानाच डिसेंबरच्या सुरुवातीला मडगावातही रिल्स ऑन हिल्स या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाची खासियत म्हणजे, त्यात धावण्यावरचे आणि सायकलिंगवर आधारित सहा चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. धावराणी पी.टी. उषा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.रवींद्र भवन मडगाव आणि साष्टी फिल्मस् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा महोत्सव 1 व 2 डिसेंबर रोजी होणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रतिनिधींना पी. टी. उषा बरोबर धावण्याचीही संधी मिळणार आहे, अशी माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. या महोत्सवात अमेरिकन, युरोपियन आणि भारतीय चित्रपट निर्मात्यांचे उत्कृष्ट आणि पुरस्कार जिंकलेल्या सहा चित्रपटांचा समावेश असून त्यात अमेरिकेचे निकॉलस शंक्र यांनी दिग्दर्शित केलेला ब्लड रोड, स्वीर्त्झलंडच्या पीएरी मोराथ यांचा फ्री टू रन, कॅनेडियन दिग्दर्शक अंजली नायर हिचा गन रनर्स, कॅनडाच्याच डेरेक फ्रान्कोवस्की व रायन गीब यांचा लाईफ साईकल्स, नेदरलँडच्या अनिका इटलिस व तिमोथी जेम्स केन यांचा द बार्कले मेरेथॉन्स व भारताच्या अक्षय शंकर व पवित्र चलम यांच्या टू फीट टू फ्लाय या चित्रपटांचा समावेश असेल. त्याशिवाय 1923 ते 33 या दरम्यान मुंबईतील सात पारशानी सायकलवरुन केलेली जगभ्रंमतीवर आधारित ग्लोब राईडस् ऑन हम्बल बाईक्स या विषयावरील छायाचित्रंचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे.1 डिसेंबरला सायंकाळी 4 वा. या महोत्सवाचे पी.टी. उषा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई उपस्थित रहाणार आहेत. दुस-या दिवशी सकाळी 7 वा. महोत्सव प्रतिनिधींची पी.टी. उषा बरोबर दौड होणार आहे. तर 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान प्रतिनिधींना पी. टी. उषा बरोबर संवाद साधता येणार आहे. या महोत्सवाबद्दल सांगताना रवींद्र भवनचे अध्यक्ष नाईक म्हणाले, मागच्या वर्षी आम्ही सायकलींगवर चित्रपट महोत्सव आयोजीत केला होता. या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहून यंदा दौड आणि सायकलींग हे दोन्ही विषय एकत्र घेऊन आम्ही यंदाचा महोत्सव आयोजित केला आहे. यापुढेही आम्ही क्रीडा प्रकारावर आयोजीत फिल्म महोत्सव घडवून आणू. यावेळी त्यांच्याबरोबर साश्टी फिल्मच्या साविया व्हिएगस याही उपस्थित होत्या.