शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर गोव्यात प्रथमच अनाथालयाची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:39 IST

गोव्यातील अनाथाश्रम आणि बालसंगोपन केंद्रातील अनागोंदी कारभाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून इशारा मिळाल्यानंतर आता प्रथमच गोव्यातील बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग या दोन यंत्रणांकडून गोव्यातील अनाथाश्रमाची पाहाणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देगोव्यातील बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग या दोन यंत्रणांकडून गोव्यातील अनाथाश्रमाची पाहाणी सुरू झाली आहे. गोव्यातील सुमारे 78 बाल संगोपन केंद्रात दोन हजारपेक्षा अधिक मुलांचे बेकायदा वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे.स्कॅन-गोवा या बिगर सरकारी संघटणेकडून उच्च न्यायालयात गोव्यातील अनाथाश्रमातील अनागोंदी संदर्भात जी रिट याचिका दाखल करण्यात आली.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - गोव्यातील अनाथाश्रम आणि बालसंगोपन केंद्रातील अनागोंदी कारभाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून इशारा मिळाल्यानंतर आता प्रथमच गोव्यातील बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग या दोन यंत्रणांकडून गोव्यातील अनाथाश्रमाची पाहाणी सुरू झाली आहे. या अभ्यासानंतर तयार करण्यात येणारा अहवाल दोन महिन्यात उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे. सध्या गोव्यातील सुमारे 78 बाल संगोपन केंद्रात दोन हजारपेक्षा अधिक मुलांचे बेकायदा वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे.

स्कॅन-गोवा या बिगर सरकारी संघटणेकडून उच्च न्यायालयात गोव्यातील अनाथाश्रमातील अनागोंदी संदर्भात जी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. महिला व बाल कल्याण खात्याने गोव्यातील विविध अनाथाश्रमात सुमारे 2090 मुलांचे बेकायदा वास्तव्य असल्याचे स्वत:च मान्य केले होते. या 78 केंद्रांपैकी केवळ दहा ते पंधरा केंद्राचाच व्यवहार योग्यप्रकारे चालतो हेही यावेळी स्पष्ट झाले होते. या दहा-पंधरा केंद्राव्यतिरिक्त इतर सर्व केंद्रात केवळ मुलांना रहाण्याची सोय आहे. तरीही ही केंद्रे ‘स्पेशल होम्स’ या संकल्पनेखाली सर्व फायदे उकळीत असल्याचेही उघडकीस आले होते. यानंतर उच्च न्यायालयाने या सर्व बाल संगोपन केंद्राची चौकशी करा असा आदेश राज्यातील मुख्य सचिवांना दिला होता.

2015 च्या बाल न्याय कायद्याप्रमाणे केवळ कायदेशीर तंटय़ातून पालकांपासून विलग झालेल्या किंवा अत्याचाराला बळी ठरलेल्या बालकांनाच अशा अनाथाश्रमात ठेवता येते. मात्र त्यापूर्वी या मुलाची केस बाल कल्याण समितीपुढे न्यावी लागते. सदर मुलाला संगोपनाची आणि संरक्षणाची गरज आहे असा निर्वाळा या समितीने दिल्यानंतरच त्यांना अनाथाश्रमात ठेवता येते. मात्र गोव्यात अनाथाश्रमात असलेले एकही मुल अशी प्रक्रिया करुन अनाथाश्रमात न पाठविल्यामुळे त्यांच्या वास्तव्याच्या वैधतेवरच प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले होते. 

महिला व बालविकास खात्याकडून जी आकडेवारी मिळाली आहे. त्यात सुमारे 2090 मुलांना अनाश्रमात ठेवून घेतल्याचे उघड झाले आहे. मात्र त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे ती पार पाडली गेली नाही. यापूर्वीही बालकल्याण समितीकडून अशा अनाथालयाची पहाणी केली असता, त्यात कित्येक गैरव्यवहार सापडले होते. या अनाथाश्रमात ठेवलेली मुले स्थलांतरित कामगारांची असल्याचे उघडकीस आले होते. एवढेच नव्हे तर या अनाथालयात गेली कित्येक वर्षे  नोंदीही व्यवस्थित ठेवल्या जात नसल्याचे उघडकीस आले होते. काही अनाथालय केवळ मुलांना आश्रय देण्याव्यतिरिक्त अन्य कुठलेही सुविधा देत नसतानाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेत असल्याचेही उघडकीस आले होते. बाल न्याय कायद्याच्या 31 कलमाखाली हे सर्व बेकायदेशीर असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबद्दल डोळेझाकच केली होती. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय