शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

अखेर खेळ हरला, 'वाद' जिंकला; क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केली परखड भूमिका

By समीर नाईक | Updated: October 25, 2023 15:49 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला एकूण ४३ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.

पणजी : ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलीबॉल क्रीडा प्रकार अखेर वगळविण्यात आला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर राज्यातील दोन व्हॉलीबॉल संघटनांचा वाद चव्हाट्यावर आला होता, केंद्रापर्यंत हा वाद पोहचला होता, कुणीही मागे घेण्यास तयार नसल्याने या स्पर्धेतून व्हॉलीबॉलला वगळविण्यात आले. अखेर वाद जिंकला आणि खेळ हरला .

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीला एकूण ४३ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात जास्त क्रीडा प्रकार असणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा गाजावाजा होत होता, पण जशी जशी स्पर्धा सुरू झाली, तसे संघटनेमधील वाद उफाळू लागले आहे. व्हॉलीबॉल बाहेर पडला आहे, आता हँडबॉल देखील याच मार्गावर आहे.

व्हॉलीबॉल नंतर हँडबॉल क्रीडा प्रकार स्पर्धेत असणार आहे की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हँडबॉल खेळ देखील दोन संघटनेच्या वादात सापडला आहे. सध्या न्यायालय हे प्रकरण पोहचले आहे. स्क्वे मार्शल आर्ट बाबत देखील हेच सुरू आहे. महत्वाचे म्हणजे राज्य सरकार व इतर यंत्रणा यामध्ये काहीच करू शकत नाही. तेही संघटनेनंच्या या गोंधळात हतबल आहेत.

एकाच खेळाची राज्यात दोन संघटना आहेत, काही जण फक्त पदे मिळविण्यासाठी संघटना तयार करत आहेत, यातून असे वाद होत आहे. यातून खेळाडूंचे भवितव्य अंधारात येत आहे. आताच्या क्षणाला राज्य सरकार किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटना काहीच करू शकत नाही, त्यामुळे जसे सुरू आहे, तसेच सुरू राहणार आहे. पण ही स्पर्धा झाल्यानंतर निश्चितच यावर मी खास बिल अस्तित्वात आणणार आहे. आणि अशाप्रकारच्या कुठल्याही गोष्टी खपवून घेतले जाणार नाही. - गोविंद गावडे, क्रीडामंत्री

टॅग्स :goaगोवाministerमंत्री