शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नाताळ, नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी 'दृष्टी'ची ॲडव्हायझरी

By किशोर कुबल | Updated: December 23, 2023 13:17 IST

किनारपट्टीवर सावधान! नाताळ आणि नववर्षा दरम्यान कळंगुट सारख्या समुद्रांवर अधिक जीवरक्षक असणे गरजेचे  आहे.

 

 

 

पणजी : नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी दृष्टी लाईफ सेविंग कंपनीने ॲडव्हायझरी जारी केली आहे. सुट्टीच्या या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे आहेत. किनारपट्टींवर  समुद्रात पोहायला ते उतरतील तेव्हा बुडण्याच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून  जीवरक्षकांची संख्या वाढवली आहे. जीवरक्षक २४ तास किनारपट्टींवर तैनात राहणार आहेत. दक्षिण गोव्यातील २७  समुद्रकिनारे आणि उत्तर गोव्यातील १८  किनारे तसेच दूधसागर आणि मयें तलावाच्या ठिकाणी बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे.

ॲडव्हायझरीमध्ये खालील सूचना केल्या आहेत.

- समुद्रकिनाऱ्याला भेट देणाऱ्यांनी वॉटरलाइनपासून किमान १०  मीटर अंतर ठेवावे आणि जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

- मद्याच्या प्रभावाखाली असल्यास पाण्यात जाऊ नका.

 - समुद्रकिनारी  मुलांवर बारीक लक्ष ठेवा,  पाण्यात जाऊ देऊ नका.

 - किनार्‍यांवरील रेतीत काचेच्या तुकड्यांपासून सावध राहा, ज्यामुळे इजा होऊ शकते.

दरम्यान,  मागच्या वर्षी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान एकूण १७१ बचावकार्ये गोव्याच्या किनाऱ्यांवर नोंदविण्यात आली होती. नाताळ आणि नववर्षा दरम्यान कळंगुट सारख्या समुद्रांवर अधिक जीवरक्षक असणे गरजेचे  आहे. ' दृष्टी'ने बचाव कार्यासाठी 'औरस' आणि 'ट्रायटन' ही दोन कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली मशीन तैनात ठेवली आहेत. त्या सोबत अनेक किनारपट्टींवर साइन बोर्ड, सर्फबोर्ड, रेस्क्यू बोर्ड, रेस्क्यू ट्यूब, हॅंडहेल्ड रेडियो सेट आणि बॅग व्हेल्व मास्क ठेवले आहेत.

दक्षिण गोव्यात बायणा, बोगमाळो, वेळसांव,  होळांत, आरोसी, माजोर्डा, उतोर्डा, बेतालभाटी, कोलवा, बाणावली, वार्का, झालोर, सेर्नाभाटी, केळशी, मोबोर, आगोंदा, बेतुल, खणगीणी, काब द राम, पाळोळें, खोला , पाटणे, राजबाग, तळपण, गलजीबाग आणि पोळें किनारी भागात तसेच उत्तर गोव्यात केरी, कोको बीच, हरमल, आश्वे- मांद्रे, मोरजी, वागातोर, हणजूण, बागा,कळंगुट, कांदोळी  सिकेरी, मिरामार, दोनापावला, शिरदोण किनारे तसेच दुधसागर धबधबा व आणि मयें तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :goaगोवा