शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात व्यावसायिक वाहनांवरील जाहिरातीवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 21:27 IST

टॅक्सी मीटर नसलेल्यांना मज्जाव; ७५ हजारापर्यंत शुल्क 

ठळक मुद्देडिजिटल टॅक्सी मीटर व जीपीएस यंत्रणे न बसविणाऱ्या वाहनांवर जाहिराती लावण्यास मज्जाव करण्याचा आदेश वाहतूक खात्याने जारी केला आहे. टॅक्सी व्यावसायिकांना आपल्या वाहनात जाहिराती लावण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.एकदा परवानगी घेतल्यास त्याची ग्राह्यता पाच वर्षांपर्यंत असेल.

पणजी: डिजिटल टॅक्सी मीटर व जीपीएस यंत्रणे न बसविणाऱ्या वाहनांवर जाहिराती लावण्यास मज्जाव करण्याचा आदेश वाहतूक खात्याने जारी केला आहे. टॅक्सी व्यावसायिकांना आपल्या वाहनात जाहिराती लावण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार वाहतूक खात्याच्या अधिकृत परवानगीशिवाय कोणताही टॅक्सी व्यावसायिक आपल्या वाहनात बाहेरच्या बाजूने किंवा आतच्या बाजूनेही जाहिरात लावू शकणार नाही. एकदा परवानगी घेतल्यास त्याची ग्राह्यता पाच वर्षांपर्यंत असेल. तसेच प्रत्येक पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागेल असे पत्रकात म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  राज्य वाहतूक प्राधिकारणाची मान्यता असलेलेच  डिजिटल मीटर आणि जीपीएस यंत्रणा बसविलेल्या  टॅक्सींसाठीच ही परवानगी दिली जाणार आहे.  जाहिराती कोणत्या प्रकारच्या असाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या नसाव्यात याचेही निकष परिपत्रकात दिले आहेत. हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या, बदनामीकारक, जुगार दारू व तंबाखुची जाहिरात करण्यास सक्त मनाई आहे. केवळ १० टक्के जागाच जाहिरातीसाठी वापरता येणार आहे. या नियमांचा भंग केल्यास केंद्रीय परिवाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. केवळ निर्बंध लादून वाहतूक खाते थांबलेले नाही तर जाहीरातीसाठी परवानगी हवी असेल तर शुल्कही भरावे लागणार आहे. ते लहान वाहनासाठी आणि मोठ्या वाहनासाठी वेगवेगळ््या स्वरूपात आहे. मालवाहू वाहानांसाठी ते अथिक आहे.  तसेच जाहिरातीच्या स्वरूपांनुसारही वेगवेगळे शुल्क ठरविण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी जाहिरातीला कमीत कमी एकरकमी शुल्क ५ हजार रुपये तर जास्तीत जास्त शुल्क ७५ हजार रुपये एवढे आहे.

टॅग्स :goaगोवाTaxiटॅक्सी