शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला स्वयंपाक करणा-या पर्यटकांवर होणार कारवाई, ठोठावणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 14:55 IST

रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणा-या पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा आहे. पर्यटक अनेकवेळा पार्किंगच्या ठिकाणी सिलींडरचा वापर करून स्वयंपाक करतात.  

म्हापसा : गोव्यात रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणा-या पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा आहे. मागील दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून पर्यटकांनी स्वयंपाकासाठी वापरलेले सिलींडर ताब्यात घेऊन त्यांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणे धोकादायक आहे. पर्यटकांना सूचना करून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे लोबो म्हणाले. पर्यटक अनेकवेळा पार्किंगच्या ठिकाणी सिलींडरचा वापर करून स्वयंपाक करतात. सिलींडरचा स्फोट झाल्यास किंवा वाहनातील इंधनाला आग लागल्यास दुर्घटनाही घडू शकते असे त्यांनी सांगितले. पर्यटन हंगाम सुरू झाल्याने बरेच पर्यटक बसेस किंवा खासगी वाहनातून येतात. मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून स्वयंपाक करतात. त्यातून सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी करतात. अशा पर्यटकांना अनेकवेळा इशाराही देण्यात आलेला. हटवण्यात आलेले; पण हे पर्यटक जागा बदलून पुन्हा तेच करतात. म्हणून कारवाई करणे भाग पडल्याचे लोबो म्हणाले.अशा प्रकारे वाहनाने गोव्यात येणा-या पर्यटकांनी एखादी खोली भाड्यावर घेऊन स्वयंपाक करावे. भाड्यावर खोली देणा-या व्यक्तीजवळ योग्य परवाना आवश्यक आहे; पण उघड्यावर स्वयंपाक केल्यास सार्वजनिक हीत, लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन कारवाई केली जाईल असे मायकल लोबो म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा