शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पणजीमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री, दंडात्मक कारवाई सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 23:28 IST

गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

पणजी : गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याच्याकडून पिशव्यांची ६ बंडले जप्त करण्यात आली.  सकाळी पालिकेचा निरीक्षक आणि त्याच्यासोबत अन्य ५ अधिकारी मार्केटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी दंडात्मक कारवाई सुरु केली. प्लास्टिक पिशव्या विकणा-याला ५ हजार रुपये आणि दुस-यांदा हाच गुन्हा केल्यास १0 हजार रुपये तसेच प्लास्टिकच्या पिशव्या वापरणा-या ग्राहकालाही १ हजार रुपये दंड ठोठावला जात आहे.

कारवाईचा सुगावा लागल्यावर काही विक्रेत्यांनी माल आवरुन तेथून काढता पाय घेतला त्यामुळे काही वेळ कारवाई थांबवून नंतर काही तासांनी अधिका-यांनी गुपचूपपणे धाडी सुरु केल्या. ग्राहकांनाही प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे. काही ग्राहकांना अधिका-यांनीअडवून त्यांनी कुठल्या दुकानातून किंवा विक्रेत्याकडून या पिशव्या खरेदी केल्या याची चौकशी केली आणि त्यानुसार संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. ५0 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैटकीत घेण्यात आलेला आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप यावर बंदी घालण्यात आली असून केवळ कापडी, कागदी व काथ्याच्या पिशव्याच वापराव्या लागतील. 

 

मनपाच्या मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मासळी बाजारात येणा-या ग्राहकांसमोर मासळी घरी कशी न्यावी हा प्रश्न आहे. कागदी पिशव्यांमध्ये ती घातल्यास पाणी गळते आणि पिशवी फुटून मासळी सांडण्याचाही धोका असतो. त्यामुळे या ग्राहकांनी प्लास्टिकची छोटी बकेट वापरावीत, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. 

महापौर विठ्ठल चोपडेकर म्हणाले की, पावसाळ्यात गटारांमध्ये प्लास्टिक अडकते आणि त्यामुळे पाणी तुंबून शहरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे. आतापर्यंत कारवाईत प्लास्टिक पिशव्या जप्त करुन आणल्या जात होत्या. आता थेट दंड आकारणी सुरु केलेली आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीgoaगोवा