शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीकडून गोमंतकीय मुलींच्या कामगिरीचा गौरव

By वासुदेव.पागी | Updated: August 23, 2023 13:28 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेत्रदीपक यश मिळविलेल्या गोव्यातील मुलींचे भरभरून कौतुक केले.

पणजी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेत्रदीपक यश मिळविलेल्या गोव्यातील मुलींचे भरभरून कौतुक केले. गोवा विद्यापीठाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के या मुली होत्या. तसेच ५५ टक्के पदवीधारकही मुलीच होत्या. 

राजभवनावर दरबार सभागृहात आयोजित केलेल्या गोवा विद्यापीठाच्या ३४ व्या पदवीदान सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या  मुर्मू यांनी गोवा विद्यापीठाच्या कार्याचा गौरव केला. तसेच विद्यापीठात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यात मुलींची संख्या अधिक प्रमाणावर असल्यामुळे आपल्याला खूप आनंद होत असल्याचेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात व्यासपीठावर राज्यपाल पी एस  श्रीधरन पिल्ले, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि  विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन उपस्थित होते. गोवा विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांचा उल्लेख करून राष्ट्रपतींनी कौतुक केले. कोंकणी विभागाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.  

माझे मुल्यमापन करताना  माझ्या यशाचे मोजमाप करू नका तर कितीवेळा मी अपयशी ठरलो आणि ते अपयश पचवून पुन्हा पुढे सरसावलो या गोष्टीवर करा’ या दक्षीण आफ्रिकेचे स्वातंत्र्य सेनानी, नोबल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांच्या  वाक्याचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांनाही नेमकी हीच वृत्ती अंगी बाळगण्याचा  संदेश दिला.   राष्ट्रपती मुर्मू यांनी २० विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका आणि पदके बहाल केली. 

राज्यपाल पी एस श्रीधर पिल्ले यांनी यावेळी आपल्या भाषणातून ‘राष्ट्र प्रथम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचा उल्लेख केला. ते म्हणाले की राष्ट्र प्रथम आणि राजकारण, धर्म आणि इतर गोष्टी या नंतर, हे तत्व अंगिकारले तरच आपण अंतीम उद्धीष्ठ गाठू शकाल असे सांगितले.