शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उद्यापासून निवासाची हॉटेल्स खुली; व्यावसायिकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 21:46 IST

सरकारने परवानगी दिल्याने हॉटेल व्यावसायिकांना आशावादी आहेत.

पणजी : गोव्यात उद्या गुरुवार २ जुलैपासून निवासाची हॉटेले खुली होतील. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून तारांकित व अतारांकित मिळून २६0 हॉटेले उघडतील त्यामुळे देशी पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. सरकारने परवानगी दिल्याने हॉटेल व्यावसायिकांना आशावादी आहेत.

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, ‘पर्यटक नसले म्हणून काय झाले? हॉटेले केवळ पर्यटकांच्याच जीवावर चालत नाहीत तर कॉर्पोरेट कंपन्यांच्या परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अन्य उपक्रमांसाठीही हॉटेले लागतात. जीपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी येणारे उमेदवार, त्यांचे पालक हेदेखिल हॉटेलांमध्ये उतरतात. आयुर्विमा महामंडळाचे अनेक कार्यक्रम होत असतात. उद्योगांचे प्रतिनिधी, तंत्रज्ञही येत असतात.                    बड्या कंपन्यांचे सीईओ, एमडी यांच्याकडून हॉटेलांसाठी विचारणा

टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, ‘हॉटेले कधी ना कधी तरी सुरु करावी लागणारच होती. सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल पर्यटन व्यावसायिक आभारी आहेत. ‘कोविड’च्या या संकटात घरी बसून काम करणारे बड्या कंपन्यांचे सीईओ, एमडी यांच्याकडून पंधरा दिवस, महिनाभराच्या वास्तव्यासाठी गोव्यातील हॉटेलांकडे विचारणा होत असे. हे अधिकारी आता गोव्यात येऊन हॉटेलांमध्ये बसून काम करु शकतील. 

लॉकडाऊनमुळे बाहेर पडता आले नव्हते त्यांना हवापालट करण्याची संधी गोव्यातील हॉटेले सुरु झाल्याने मिळेल. शहा म्हणाले की, ‘उद्या ३ तारीखपासून मुंबई- गोवा विमानसेवाही सुरु होत आहे. आठवड्यातून तीन दिवस इंडिगोची विमाने मुंबईहून येणार आहेत. दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद येथून याआधीच विमानसेवा सुरु झालेली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून गोव्यात पर्यटनासाठी किंवा विश्रांतीसाठी येऊ इच्छिणारे लोक येथील निवासाची हॉटेले कधी सुरु होणार याची चौकशी करीत होते. त्यांचा गोवा भेटीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.                                 वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका!

शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार तारांकित व इतर मिळून राज्यात ३८५0 हॉटेले आहेत. पैकी केवळ २६0 हॉटेलमालकांनी हॉटेले खुली करण्यासाठी अर्ज केलेले आहेत. इतरांची ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ भूमिका आहे. सध्या ऑफ सिझन असल्याने ऑक्टोबरनंतरच हॉटेले सुरु करण्याचा निर्णयही काहीजणांनी घेतला आहे.

शहा म्हणाले की, ‘ कर्नाटकात अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे. लोक बंगळुरुहून ऊटी, म्हैसूर, कूर्गला जाऊ लागले आहेत. पर्यटनाच्या बाबतीत तेथील कवाडे खुली झालेली आहेत. गोव्यातही लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागलेले काही लोक बदल म्हणून एक दोन दिवसाच्या वास्तव्यासाठी हॉटेलांमध्ये येऊ शकतात. सध्या ऑफ सिझनमध्ये हॉटेलचे दरही कमी असतील.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेलgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत