शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे दोन हजार बारना दिलासा

By admin | Updated: March 28, 2017 03:06 IST

पणजी : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून पाचशे मीटरमधील २ हजार ७०० बार आणि दारू दुकानांपैकी १ हजार ९११ बार

पणजी : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून पाचशे मीटरमधील २ हजार ७०० बार आणि दारू दुकानांपैकी १ हजार ९११ बार आणि दुकानांना सोमवारी राज्य सरकारतर्फे दिलासा मिळाला. किरकोळ दारू विक्री करणारी ७८९ दुकाने मात्र बंद करावी लागतील. घाऊक दारू विक्री करणारी दुकाने, बार व रेस्टॉरंट्स बंद करावी लागणार नाहीत, अशी भूमिका पर्रीकर सरकारने स्पष्ट केली.सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून पाचशे मीटरमधील बार आणि दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. परिणामी एक एप्रिलपासून अशा आस्थापनांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही. या पार्श्वभूमीवर व्यावसाययिक धास्तावले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर अबकारी खात्याने मामलेदारांमार्फत अशी पाहणी केली असता सुमारे २ हजार ७०० बार व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून द्यायचे नाही, अशी भूमिका अबकारी खात्याने पार्सेकर सरकार अधिकारावर असताना घेतली होती. दरम्यान निवडणुका होऊन मनोहर पर्रीकर सरकार सत्तारूढ झाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल व अन्य कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. न्यायालयाचा आदेश नेमका कोणत्या आस्थापनांना लागू होतो हे त्यांनी जाणून घेतले.महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरच्या अंतरात असलेली बार व रेस्टॉरंट्स तसेच घाऊक विक्रीची दुकाने बंद करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर काढला आहे. फक्त दोन-तीन बाटल्या याप्रमाणे किरकोळ दारू विक्री करणारी ७८९ दुकाने बंद करावी लागतील. राज्य महामार्गांचे जिल्हा मार्गांमध्ये रूपांतर करावे वगैरे मागण्या मद्य व्यावसायिक करत आहेत; पण कायद्याच्या दृष्टिकोनातून तसे करणे अजून तरी सरकारला शक्य झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील सर्व महामार्गांच्या बाजूच्या मद्यालयांचे व दारू दुकानांचे परवाने नूतनीकरण थांबले होते. येत्या ३१ रोजी मुदत संपत असल्याने परवान्यांचे नूतनीकरण येत्या दि. २९ पासून सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने लेखी आदेश येत्या २९ रोजी जारी होईल. मात्र, सर्वोच्च न्यायालय अन्य राज्यांच्या फेरविचार याचिकांवर कोणता निर्णय घेते याकडेही गोवा सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे पर्रीकर यांचा सध्याचा निर्णय हा फेरविचार याचिकांद्वारे येणाऱ्या फलनिष्पत्तीवरही अवलंबून आहे.(खास प्रतिनिधी)