शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलाला गरम चमच्याने चटका देणाऱ्या अंगणवाडी सेविकेला 5 दिवस तुरुंगवास, १ लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 18:39 IST

अडीच वर्षाच्या अंगणवाडीतील मुलाला गरम चमच्याने चटका देणाऱ्या अंगणवाडी सेविकेला गोवा बाल न्यायालयाने दोषी ठरवत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मडगाव: अडीच वर्षाच्या अंगणवाडीतील मुलाला गरम चमच्याने चटका देणाऱ्या अंगणवाडी सेविकेला गोवा बाल न्यायालयाने दोषी ठरवत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय पाच दिवस तुरुंगाची शिक्षा देण्यात आली आहे. 2015 मध्ये झालेल्या या प्रकरणाचे पूर्ण गोव्यात पडसाद उमटले होते. या निवाडय़ातून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत आणि गोव्यातील मुले सुरक्षीत रहातील हा संदेश सर्व समाजाकडे पोहोचू शकेल असा अभिप्राय बाल न्यायालयाच्या अध्यक्ष वंदना तेंडुलकर यांनी आपल्या आदेशात व्यक्त केला. 

एप्रिल 2015 मध्ये सातेरीवाडी-कामुर्ली येथे ही घटना घडली. या वाडय़ावरील अंगणवाडीत येणा:या अडीच वर्षाच्या मुलाला सदर सेविकेने गरम चमच्याने चटका दिल्याने त्याच्या गालावर जखम झाली होती. या प्रकरणानंतर सेविकेला अटक करण्यात आली होती. त्या दिवशी त्या केंद्रात  एकूण पाच मुले होती. आपल्या मुलाला अंगणवाडी केंद्रात ठेऊन मुलाची आई कामाला गेल्याने ते मुल जोरजोरात रडत होते. त्यामुळेच या सेविकेने रागाने त्याला गरम चमच्याने डागले. अंगणवाडी केंद्राच्या शिक्षिकेने या सेविकेच्या विरोधात न्यायालयात दिलेल्या साक्षीवर विसंबून न्यायालयाने हा आदेश दिला.

तसेच हा प्रकार भयंकर असून त्यासाठी या सेविकेला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी मागणी सरकारी वकील एफ. नोरोन्हा यांनी न्यायालयासमोर केली. मात्र संशयिताच्यावतीने बाजू मांडणारे वकील दामोदर धोंड यांनी सदर सेविका अत्यंत गरीब असून तिला कामावरुन काढून टाकल्याने तिच्याकडे रोजगाराचा पर्याय उपलब्ध नाही. तिच्या नव:यालाही मस्कतवरील नोकरीतून काढून टाकले असून तिला दोन मुलांचा प्रतिपाळ करावा लागतो. त्यांच्याकडे बघण्यासाठी आणखी कुणी नसल्याने न्यायालयाने शिक्षा देताना दया दाखवावी अशी मागणी केली. सदर महिलेचे वय आणि घरची परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने केवळ तिला पाच दिवसांचीच शिक्षा दिली. दंडाची रक्कम राष्ट्रीय बाल निधीत किंवा राज्य बाल निधीत जमा करावी असे या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा