शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीत उभारला अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2024 13:00 IST

सोमवारी १९ रोजी  शिवजयंती निमित्त पुतळ्याचे आनावरण होणार तसेच विधिवत पुजा होणार आहे. 

-नारायण गावस

पणजी:  साेमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने राजधानीत पहिला भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज्यांचा अश्वरुढ पुतळा उभारण्यात आला आहे. पणजी मळा शिवप्रेमींनी पुढाकार घेऊन युवकांनी हा पुतळा उभारला असून सोमवारी १९ रोजी शिवजयंती निमित्त पुतळ्याचे आनावरण होणार तसेच विधिवत पूजा होणार आहे.

राजधानी पणजीत यंदा प्रथमच अशी भव्य दिव्य अशी शिवमिरवणूक हाेणार आहे. पणजी महानगर पालिकेतर्फे यंदा शिवजयंती निमित्त रॅली काढली जाणार आहे. तसेच आता पणजी मळा युवक संघटनेतर्फे हा भव्य असा शिवपुतळा उभारल्याने अनेक शिवभक्तांमध्ये आनंद पसरला आहे. पणजी राजधानीत कुठेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नव्हता म्हापसा तसेच इतर राज्यातील बहुतांश शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अनेक संस्थानी आपल्यापरीने ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी महाराज्यांचे पुतळे उभारले आहेत. आता पणजी वासियांनी पुढाकर घेत हा पुतळा उभारला आहे.

पुतळ्यासाठी अनेकांनी दिली देणगी

हा पुतळा आणण्यासाठी तसेच उभारण्यासाठी पणजीतील अनेक उद्याेजकांनी, व्यावसायिक, राजकारणी तसेच समाज सेवकांनी आर्थिक सहाय केेले आहे. प्रत्येकाने आपल्यापरीने हा पुतळा उभारण्यासाठी देणगी दिली आहे. तसेच सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे. त्यामुळे उद्या पणजीत भव्य अशी मिरवणूक हाेणार आहे. तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहे. राज्यात पर्यटन खात्यातर्फे डिचाेली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर राज्यव्यापी शासकीय शिवजयंती साजरी होणार आहे. तसेच इतर सर्व ठिकाणी सोमवारी शिवजयंतीचा माेठ्या उत्सहात कार्यक्रमही हाेणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजgoaगोवा